काकू बनली पत्नी, पुतण्याने दाखवली भलतीच जादू; काकू म्हणाली मला तूच हवा...
Aunt and Nephew Affair: बिहारच्या जमुई येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे, एका महिलेने तिचा पती आणि मुलीला सोडून तिच्या पुतण्याशी लग्न केले.
ADVERTISEMENT

जमुई (बिहार): प्रेम कधीही, कुठेही आणि कोणासोबतही होऊ शकते. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पण प्रेमात नातांच्या सीमारेषांच्या लक्षात नाही ठेवल्या तर सगळं आयुष्यच बिघडून जातं. अशीच घटना बिहारच्या जमुईमध्ये घडली. येथे एका विवाहित महिलेचं तिच्याच पुतण्यासोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं. काकू आणि पुतण्या हे दोघेही गुप्तपणे भेटायचे. पण अखेर पतीला या गोष्टीचा सुगावा लागलाच. ज्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. अखेर समुपदेशनानंतर पत्नी तिच्या पतीसोबत परतली, पण आता 6 दिवसांपूर्वी काकू थेट घरातूनच पळून गेली आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना टाउन पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील आहे. आयुषी आणि विशालचे 8 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर एका मुलीचाही जन्म झाला. दोघांमधील नाते चांगले चालले होते. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी त्याच गावातील एका तरुणाचा आयुषी हिच्या आयुष्यात प्रवेश झाला. खरं तर हा तरूण या महिलेच्या पतीचा दूरचा पुतण्या होता. त्यामुळे त्याचं येणं-जाणं साहजिक होतं. म्हणूनच सुरुवातीला दोघांबाबत फारशी कोणाला शंका आली नाही. मात्र, नंतर ते दोघेही तासनतास एकत्र राहायचे.
हे ही वाचा>> दोन मुलांची आई चटावलेली अनैतिक संबंधाला, तरुण मुलाच्या नादात बसली नको ते करून...
दोघांमधील जवळीक अधिक वाढत गेली आणि आयुषीने पतीला सोडून तिचा पुतण्या सचिनसोबत राहण्याचा आग्रह धरला. या प्रकरणी पतीने एकदा पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. त्यामुळे पोलिसांनी काकू आणि पुतण्याला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची समजूत काढली. त्यामुळे आता प्रकरण मिटलं असं सगळ्यांना वाटू लागलेलं. आता सर्व काही व्यवस्थित होईल असं वाटत होतं. याच दरम्यान, प्रियकर म्हणजे पुतण्या सचिन आणि महिलेचा पती म्हणेजच काकामध्ये भांडणं सुरू झाली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर देखील सचिन हा आयुषीला भेटत होता. अखेर 6 दिवसांपूर्वी आयुषी घर सोडून सचिनसोबत पळून गेली.
पुतण्यासोबत काकू पळून गेली, पण...
विशालने आपल्या पत्नीला बंदुकीच्या धाक दाखवून अपहरण झालं असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तक्रारीनुसार, 6 दिवसांपूर्वी ती माझ्यासोबत होती. पण त्याच रात्री ती गायब झाली. असं त्यात म्हटलंय.
यावेळी सचिनवर अपहरणाचा आरोप करण्यात आला.
हे ही वाचा>> मामी गेली 12 वर्ष लहान भाच्यासोबत पळून! मामाची सटकली; म्हणाला, तीन वर्षांपासूनच बायकोचा..
पतीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी वाढता दबाव लक्षात घेऊन पुतण्या सचिन आणि काकू आयुषीने यांनी थेट न्यायालयात आत्मसमर्पण केले. यावेळी दोघांचेही जबाब नोंदवण्यात आले.
आयुषीने सचिनसोबत राहण्यास सहमती दर्शवली आहे. तर आयुषीची मुलगी ही तिचे वडील विशाल दुबे यांच्याकडे आहे. न्यायालयात आपला जबाब दिल्यानंतर, आयुषीने गावातील मंदिरात सचिनशी लग्न केले. सचिन आणि आयुषीच्या या कृत्याला गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला. शेवटी सचिनला आयुषीसोबत तो परिसर सोडावा लागला. आता दोघेही दुसरीकडे राहत आहेत.