Lok Sabha Security Breach : लोकसभेत घुसखोरी! टिअर गॅस फवारणारे ते दोघे कोण?
Security breach in Lok Sabha : लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी केली. त्यांनी गॅस फवारला. या दोघांना खासदारांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
ADVERTISEMENT

Security Breach in Parliament : संसदेवरील हल्ल्याच्या स्मृतिदिनीच संसदेच्या सुरक्षेला चकमा देत दोन जणांनी लोकसभेत घुसखोरी केली. प्रेक्षक गॅलरीतून खाली उड्या घेत दोघांनी लोकसभेत गोंधळ घातला. घुसखोरी करणाऱ्यांनी लोकसभेत अश्रुधुरांचे स्प्रे मारले. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. हा सगळा घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अंगावर काटा आणणारी घटना लोकसभेत बुधवारी (13 डिसेंबर) घडली. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या. त्यानंतर दोन्ही तरुण खासदार बसतात, त्या टेबलांवरून उड्या मारत पळायला लागले. त्याचवेळी एका तरुणाने बुटात लपवून आणलेला स्प्रे बाहेर काढला आणि सभागृहात फवारला.
#WATCH | An unidentified man jumps from the visitor’s gallery of Lok Sabha after which there was a slight commotion and the House was adjourned. pic.twitter.com/Fas1LQyaO4
— ANI (@ANI) December 13, 2023
दोन्ही तरुणांच्या हातात अश्रू गॅस कॅन होते, असे घटनेवेळी सभागृहात असलेल्या खासदारांनी सांगितले. दोन्ही तरुणी स्प्रे फवारत असताना आणि टेबलवरून उड्या मारत असताना काही खासदारांनी त्यांना पकडले आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली. त्यामुळे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं.










