Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीसांकडून महापालिका निवडणुकीसाठी ‘मत’पेरणी!
Devendra Fadnavis Budget Speech : शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Goverment) पहिला अर्थसंकल्प (Budget) आज वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी साजरा केला. या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या घटकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने महत्त्वाच्या महापालिका असलेल्या शहरांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने अर्थसंकल्पातून मत पेरणी केल्याचा सूर राजकीय […]
ADVERTISEMENT

Devendra Fadnavis Budget Speech : शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Goverment) पहिला अर्थसंकल्प (Budget) आज वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी साजरा केला. या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या घटकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने महत्त्वाच्या महापालिका असलेल्या शहरांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने अर्थसंकल्पातून मत पेरणी केल्याचा सूर राजकीय वर्तुळ आणि विश्लेषकांमधून उमटला आहे. (Devendra Fadnavis Big Announcement in Maharashtra Budget 2023)
मुंबई महापालिकेसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका आधी कोरोना, तर नंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं रखडल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका यंदा होतील, अशी अपेक्षा आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, नाशिकमध्ये राजकीय पक्षानी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. त्यामुळेच या शहरांसाठी करण्यात आलेल्या घोषणांना निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्व प्राप्त झालं आहे.
मी अमृताकडे वळतो म्हटलं तर तुम्ही वेगळाच अर्थ काढाल: देवेंद्र फडणवीस
सरकारने महापालिका निवडणुका होऊ घातलेल्या शहरांसाठी कोणत्या घोषणा केल्या?
अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेप्रमाणे, मुंबईत 337 किमी मेट्रोचे जाळे उभारण्यात येणार असून, 46 किमी खुला झाला आहे. आणखी 50 किमी यावर्षी खुला होणार आहे.