Maharashtra News : माहिम दर्गा अनधिकृत बांधकाम तोडल्याप्रकरणी मनसेच्या अमेय खोपकरांचं ट्वीट
माहिम दर्गा अनधिकृत बांधकाम तोडल्याप्रकरणी मनसेच्या अमेय खोपकरांचं ट्वीट गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांची 22 मार्च रोजी शिवाजी पार्कवर सभा झाली. यावेळी त्यांनी माहिम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याबाबत उल्लेख केला. त्यानंतर, हा मुद्दा चांगलाच चर्चेत रंगल. 23 मार्च रोजी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या सात जणांच्या पथकाने यांची पाहणी करत कारवाई केली. मुंबई महापालिकेच्या मदतीने अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. […]
ADVERTISEMENT

माहिम दर्गा अनधिकृत बांधकाम तोडल्याप्रकरणी मनसेच्या अमेय खोपकरांचं ट्वीट
गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांची 22 मार्च रोजी शिवाजी पार्कवर सभा झाली. यावेळी त्यांनी माहिम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याबाबत उल्लेख केला. त्यानंतर, हा मुद्दा चांगलाच चर्चेत रंगल. 23 मार्च रोजी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या सात जणांच्या पथकाने यांची पाहणी करत कारवाई केली. मुंबई महापालिकेच्या मदतीने अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चांगलाच टोला लगावला आहे. एक फोटो शेअर करत ‘हिंदुत्वाचं ढोंग नाही “Results” देणारं खर हिंदुत्व !!’ असं कॅप्शन त्यांनी लिहिलं आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये असं लिहिलं आहे की, ‘काही जण एका महिलेच्या घरावरती हाथोडा चालवून मर्दपणा दाखवत होते!आता हे खरं उखाड दिया’ अशी खोचक टीका अमेय खोपकरांनी केली आहे.
सावकरांवरून पुन्हा ठिणगी! राहुल गांधींविरोधात विधानसभेत गदारोळ
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वि.दा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानांचा मुद्दा आज शिवसेनच्या (शिंदे गट) आमदारांनी उपस्थित केला. सावरकरांचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान असून, राहुल गांधी त्यांचा वारंवार अपमान करत असल्याचं आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.
संजय शिरसाट या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. माझा जुन्या सहकाऱ्यांना सवाल आहे की, राहुल गांधींच्या विधानाला तुमचा पाठिंबा आहे का?, असा सवाल त्यांनी केला.