Maharashtra Weather update : अवकाळी झोडपणार, IMD कडून 6 जिल्ह्यांना इशारा

मुंबई तक

Maharashtra Rain Alert : होळी आणि शिमग्याचा सणात महाराष्ट्रातल्या काही भागातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. मराठवाडा, विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी झोडपलं आहे. काही भागात गारपीट झाली असून, पिकांचं प्रचंड नुकसान झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्याबरोबरच अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra Rain Alert : होळी आणि शिमग्याचा सणात महाराष्ट्रातल्या काही भागातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. मराठवाडा, विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी झोडपलं आहे. काही भागात गारपीट झाली असून, पिकांचं प्रचंड नुकसान झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्याबरोबरच अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

नाशिक जिल्ह्याला देखील सोमवारी पहाटे पासून विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे 1800 हेक्टर गहू, 775 हेक्टर द्राक्ष तर 65 हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पुणे, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव या भागांमध्ये देखील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

राज्यात पाऊस का पडतोय?

मागील काही दिवसांत वातावरणात बदल झाल्यानं पुढील 4 ते 5 दिवस राज्यात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात विविध ठिकाणी पाऊस का होतोय याबाबत मुंबई Takने हवामान शास्त्रज्ञ प्राध्यापक किरणकुमार जोहरे यांच्याशी संपर्क केला.

जोहरे म्हणाले, “पावसाचे वातावरण पुढील 4 ते 5 दिवस राहील. त्याचबरोबर काही भागांमध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. वातावरणात असलेल्या अस्थिरतेमुळे गारपीटची शक्यता वाढते. उन्हाचा पारा वाढलेला आहे. या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन देखील होत आहे. त्यामुळे त्याचे ढग तयार होऊन पाऊस होत आहे. दिवसा गरम आणि रात्री थंडी जाणवत असल्याने वातावरणात अस्थिरता निर्माण होऊन पावसाचे ढग तयार होत आहेत. असं असलं तरी ही स्थिती काही काळासाठीची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये”, असे आवाहन देखील जोहरे यांनी केले आहे.

IMD Alert : सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, अमरावती या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp