Maharashtra Corona : राज्यात शुक्रवारी २२८५ पॉझिटव्ह रूग्णांची नोंद, पाच मृत्यूंची नोंद

मुंबई तक

महाराष्ट्रात कोरोनाचे २२८५ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर पाच मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात २२३७ रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात पाच कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के इतका झाला आहे. तर आत्तापर्यंत राज्यात ७९ लाख २० हजार ७७२ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे कोरोना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोनाचे २२८५ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर पाच मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात २२३७ रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात पाच कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के इतका झाला आहे. तर आत्तापर्यंत राज्यात ७९ लाख २० हजार ७७२ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे कोरोना रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.२ टक्के झालं आहे.

राज्यात बीए 4 आणि 5 चे ७३ तर बीए 2.75 चे २०९ रूग्ण

राज्यात बीए 4 आणि 5 चे ७३ रूग्ण आहेत. तर बीए 2.75 या व्हेरिएंटचे २०९ रूग्ण आहेत. बीए 2.38 या प्रकारचे रूग्ण आधी वाढत होते मात्र ते कमी होत आहेत. या सर्व रूग्णांचा सखोल साथरोग शास्त्रीय पद्धतीने आढावा घेण्यात येतो आहे. राज्यात सध्याच्या घडीला ११ हजार ६९० सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक म्हणजेच ५ हजार ७१२ इतके रूग्ण आहेत. त्याखालोखाल ठाण्यात १६५९ सक्रिय रूग्ण आहेत.

गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या आठ हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र, या आठवड्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी १५ हजार ७५४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

बुधवारी देशात १२ हजारांहून जास्त रूग्णांची नोंद

बुधवारी १२ हजार ६०८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. एका दिवसात कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये तब्बल ३१४६ रुग्णांची वाढ झाली आहे. यासोबतच देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या देशभरात एक लाखांहून जास्त कोरोना रूग्ण आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे. आता देशात एकूण १ लाख १ हजार ८३० कोरोना रुग्ण आहेत. तर गुरुवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे ३१ लाख ५२ हजार ८८२ डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मता दर ३.४७ टक्के, तर आठवड्याचा सकारात्मता दर ३.९० टक्के आहे. तसेच देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.५८ टक्के आहे

दिल्लीत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ

दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोविड संसर्गाचे प्रमाण सुमारे 20 टक्के आहे. यासोबतच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 17 दिवसांत कोविडमुळे 87 लोकांचा मृत्यू झाला आहे. धोका लक्षात घेता 149 कंटेनमेंट झोन वाढवण्यात आले आहेत.

Omicron BA.2.75 या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे रुग्ण वाढत असल्याची भीती आहे. त्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या तरी डॉक्टर सावधगिरी बाळगण्यावर भर देत आहेत, तर सरकारचे म्हणणे आहे की लवकरात लवकर बूस्टर डोस मिळाल्यास हे टाळता येईल. दिल्लीशी संबंधित एक आकडाही समोर आला आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्णांनी बूस्टर डोस घेतला नसल्याचे आढळून आले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp