ठाकरेंना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरणार? BMC च्या व्यवहारांवर संशय, ‘कॅग’ करणार चौकशी
मुंबई महापालिकेच्या विविध कामांची आता कॅग अर्थात नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) चौकशी केली जाणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने कॅगला चौकशी करण्याची विनंती केली होती. आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी ही खेळी असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीये. कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप […]
ADVERTISEMENT

मुंबई महापालिकेच्या विविध कामांची आता कॅग अर्थात नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) चौकशी केली जाणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने कॅगला चौकशी करण्याची विनंती केली होती. आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी ही खेळी असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीये.
कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून आधीपासून केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी याबद्दल विधिमंडळातही हा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप केले होते.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेकडून झालेल्या १२ हजार कोटींच्या कामाची चौकशी करावी अशी विनंती कॅगकडे केली होती. कॅगने राज्य सरकारची विनंती मान्य केली असून, कॅग महापालिकेतल्या संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या कामांची चौकशी करणार आहे.
मुंबई महापालिकेतील कोणत्या कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप?
BMC Covid Centres Scam Allegation : कोविड सेंटर आणि वैद्यकीय सेवा पुरवण्याचे कंत्राटं मुंबई महापालिकेकडून कोरोना काळात देण्यात आले होते. मात्र, ही प्रक्रिया अपारदर्शकपणे करण्यात आल्याचा आरोप आहे. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस २६ जून २०२० रोजी कंत्राट दिलं गेलं, त्यावेळी या कंपनीची नोंदणीच झालेली नव्हती. या कंपनीला अपारदर्शक पद्धतीने १०० कोटींचं कंत्राट देण्यात आलं, असा आरोप आहे.