“एकनाथ शिंदे घरी बसून राहणारे मुख्यमंत्री नाहीत” देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आपण सर्वांनी दहीहंडीच्या दिवशीची मुंबई पाहिली का? तोच उत्साह, तोच जल्लोष आपण आपलं सरकार आल्यानंतर पाहिला. शुक्रवारी दहीहंडी जोरात आणि आता गणेशोत्सव जोरात, नवरात्र जोरात, शिवजयंती जोरात, आंबेडकर जयंती जोरात सगळं जोरात करायचं आहे. आता मुख्यमंत्री घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मुंबईतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?

आपले मुंबईचे नूतन अध्यक्ष आशिष शेलार यांचं मी अभिनंदन करतो. आशिष शेलार हे अतिशय अनुभवी आहेत. मुंबईत प्रदीर्घ काळ त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं. यावेळीही पक्षाने पुन्हा त्यांना ती जबाबदारी दिली त्याचं कारण आहे. आपण छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. छत्रपतींच्या इतिसाहात जेव्हा एखादी मोहीम असायची आणि स्वराज्यासाठी ती मोहीम महत्त्वाची असायची तेव्हा महाराज आपल्या शिलेदारांपैकी बिनीचा शिलेदार निवडायचे आणि त्याला ती जबाबदारी द्यायचे. त्याच प्रमाणे आशिष शेलार यांना आपल्या पक्षाने ही जबाबदारी दिली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिकेची मोहीम आशिष शेलार फत्ते करतील याबाबत मला शंका नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे

मुंबईत मागच्या वेळीही आपण चांगली मजल मारली होती. भाजपचा महापौर मागच्याच वेळी बसू शकला असता. मात्र आपल्या मित्रपक्षासाठी आपण दोन पावलं मागे आलो. त्यांना महापौर बनवू दिला. आता मुंबई महापालिकेवर शिवसेना भाजप युतीचाच महापौर बसेल. पण ही कुठली शिवसेना ? तर माननीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिंदेंजीच्या नेतृत्वातली खरी शिवसेना. ती शिवसेना आणि भाजप मिळून महापालिकेवर भगवा फडकवणार त्याशिवाय शांत बसणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबई महापालिकेचा सामना आशिष शेलार जिंकणार हा मला पूर्ण विश्वास आहे. महानगरपालिकेत आपल्याला मुंबई विकास लीग सुरू करायची आहे. त्यात मधेमधे अडचणी-अडथळे येतात. आशिषजींना मी सांगेन की तुम्ही फुटबॉलची अनेक मैदानं तयार केली आहेत त्यामुळे तुम्हाला कीक कशी मारायची माहित आहे असंही देवेंद्र फडणवीस हे आपल्या भाषणात म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT