Ganesh Utsav 2022 : बाप्पा मोरया रे! लालबागच्या राजाची पहिली झलक
यंदा कोरोनाचं संकट संपल्यानंतर पहिल्यांदाच गणेश उत्सव अत्यंत धुमधडाक्यात साजरा केला जातो आहे. कुठल्याही निर्बंधांशिवाय यंदा गणेश उत्सव साजरा होतो आहे. मूर्तीच्या उंचीची बंधनं किंवा कुठल्याही मर्यादा यावेळी नाहीत. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. अशात लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाने बाप्पाची पहिली झलक समोर आणली आहे. Ganesh Chaturthi 2022 : गणेश उत्सव […]
ADVERTISEMENT

यंदा कोरोनाचं संकट संपल्यानंतर पहिल्यांदाच गणेश उत्सव अत्यंत धुमधडाक्यात साजरा केला जातो आहे. कुठल्याही निर्बंधांशिवाय यंदा गणेश उत्सव साजरा होतो आहे. मूर्तीच्या उंचीची बंधनं किंवा कुठल्याही मर्यादा यावेळी नाहीत. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. अशात लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाने बाप्पाची पहिली झलक समोर आणली आहे.
Ganesh Chaturthi 2022 : गणेश उत्सव कधी सुरू होणार? कशी करायची बाप्पाची स्थापना?
लालबागचा राजाची पहिली झलक
लालबागचा राजा गणपतीची पहिली झलक खुली करण्यात आली आहे. सिंहासनावर बसलेल्या रूपात गणपती बाप्पा दिसतो आहे. त्याच्या एका हातात गदा आहे. एका हातात चक्र आहे. आशीर्वादाचा हातही ऱेखीव आहे. तसंच एका हातात मोदक आहे. वर्षानुवर्षे लालबागच्या राजाची ही अशीच मूर्ती घडवली जाते. यावेळी अयोध्येतील राम मंदिराचा सेट लालबाग या ठिकाणी उभारण्यात आला आहे. यामध्ये बाप्पा विराजमान होणार आहे.