मोठी बातमी! संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला, पण ‘या’ गोष्टींना परवानगी
मुंबई: शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. राऊतांची १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी वाढवण्यात आली आहे. पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊतांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीनं संजय राऊतांची कोठडी वाढवून मागितली होती. आज त्यांना PMLA कोर्टात हजर करण्यात आले होते. संजय राऊत यांच्या वकिलानं न्यायालयात सांगितले की, त्यांनी अद्याप […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. राऊतांची १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी वाढवण्यात आली आहे. पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊतांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीनं संजय राऊतांची कोठडी वाढवून मागितली होती. आज त्यांना PMLA कोर्टात हजर करण्यात आले होते. संजय राऊत यांच्या वकिलानं न्यायालयात सांगितले की, त्यांनी अद्याप जामिनासाठी अर्ज केलेला नाही.
न्यायालयानं संजय राऊतांना काही गोष्टी करायला दिली परवानगी
ईडीने न्यायालयीन कोठडी वाढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता, त्याला परवानगी देण्यात आली आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना संसदेच्या काही फॉर्मवर स्वाक्षरी करण्यास तसेच त्याची प्रत न्यायालय आणि ईडीला देण्यास मान्यता दिली आहे. एका वकिलाने न्यायालयात युक्तीवाद केला की ते महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यावर न्यायाधीश एम.जी.देशपांडे यांनी आपण या खटल्यात पक्षकार नसल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला. संजय राऊत यांच्या आई आणि पत्नीसह कुटुंबीय न्यायालयात हजर होते. राऊत यांचे अनेक समर्थकही न्यायालयात पोहोचले होते.
काय आहे पत्रा चाळ प्रकरण?
गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडासोबत गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी करार केला होता. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनला याठिकाणी 3,000 अधिक फ्लॅट तयार करायचे होते. एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट हे पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरुआशिष फ्लॅटकडे राहणार होते.
दरम्यान, गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केली. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.