आशिष शेलारांचा इशारा, उद्धव ठाकरेंनी पुन्हा डिवचलं; ‘कमळबाई’वरून वाद वाढणार?
“कमळाबाई आता ‘हात’ घाईवर” अशा मथळ्याखाली सामनात बातमी प्रसिद्ध झाली. या मथळ्यातील कमळाबाई शब्दावर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलारांनी संपादक उद्धव ठाकरेंना इशारा दिला. शेलारांच्या इशाऱ्यानंतर ठाकरेंनी पुन्हा कमळबाई म्हणत भाजपला डिवचलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा एक गट बाहेर पडून भाजपत जाणार असल्याची चर्चा सुरूये. त्यातच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री […]
ADVERTISEMENT

“कमळाबाई आता ‘हात’ घाईवर” अशा मथळ्याखाली सामनात बातमी प्रसिद्ध झाली. या मथळ्यातील कमळाबाई शब्दावर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलारांनी संपादक उद्धव ठाकरेंना इशारा दिला. शेलारांच्या इशाऱ्यानंतर ठाकरेंनी पुन्हा कमळबाई म्हणत भाजपला डिवचलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा एक गट बाहेर पडून भाजपत जाणार असल्याची चर्चा सुरूये. त्यातच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाल्यानं चर्चेला उधाणच आलं. याचसंदर्भातील बातमी सामनात प्रसिद्ध झाली, पण बातमीच्या मथळ्यात भाजपचा उल्लेख कमळाबाई करण्यात आला.
उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनात भाजपला कमळाबाई म्हणून डिवचण्यात आलं. त्यामुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार चांगलेच भडकले. आशिष शेलारांनी लागलीच ट्विट करत संपादक उद्धव ठाकरेंना इशारा दिला.
आदित्य ठाकरेंचा ‘बीएमसी’तील ड्रीम प्रोजेक्ट वादात?; आशिष शेलारांनी केले गंभीर आरोप