मुंबईतील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये MBBS विद्यार्थ्याची आत्महत्या; नेमकं कारण काय?
मुंबईतील मेडिकल कॉलेजमधील MBBS च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका 22 वर्षीय विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या रुममध्ये आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईतील कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

MBBS च्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्याची हॉस्टेल रुममध्ये आत्महत्या

आत्महत्येमागचं नेमकं कारण काय?
Mumbai News: ग्रँट (Grant) मेडिकल कॉलेजमधील MBBS च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका 22 वर्षीय विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या रुममध्ये आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. यासाठी आर्थिक अडचणी आणि शैक्षणिक तणाव कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. या तरुणाने रविवारी रात्री आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
ही घटना मुंबईतील सर जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या अपना बॉईज हॉस्टेलमध्ये घडली. या प्रकरणासंदर्भात सर जे.जे. मार्ग पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 194 अंतर्गत अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवला आहे.
हॉस्टेलच्या खोलीत पंख्याला लटकून...
या घटनेतील मृत पावलेल्या तरुणाचे नाव रोहन रामफेर प्रजापती असं असून तो जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या अपना बॉईज हॉस्टेलच्या पाचव्या मजल्यावरील खोली क्रमांक 198 मध्ये राहत होता. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या हॉस्टेलमधल्या खोलीत नायलॉनच्या दोरीने छताच्या पंख्याला लटकलेला आढळला.
हे ही वाचा: सोनमने प्रॉपर प्लॅन केला, प्रियकराला इंदोरमध्येच थांबवून मारेकऱ्यांना... पोलीस चौकशीत मोठा खुलासा
अभ्यास आणि आर्थिक समस्या
रोहनला अभ्यास आणि घरी आर्थिक समस्या येत असल्याचं सुरुवातीच्या तपासात दिसून आलं. याच समस्यांमुळे त्यानं हे पाऊल उचललं असावं, असा अंदाज वर्तवला जात आहे. पीडित तरुणाला तातडीने जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात रात्री 10:50 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हे ही वाचा: नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह; डोक्यावर खोलवर जखमा, पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहनसोबत त्याच्या खोलीत त्याचा मित्र रितेश विश्वकर्मा राहत होता. पोलिसांनी वसतिगृहातील सहकारी विद्यार्थी आणि वर्गमित्रांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.