सोनमने प्रॉपर प्लॅन केला, प्रियकराला इंदोरमध्येच थांबवून मारेकऱ्यांना... पोलीस चौकशीत मोठा खुलासा

मुंबई तक

सोनम आणि राजा यांचा विवाह याच वर्षी जानेवारी 2025 मध्ये झाला होता. रघुवंशी समाजाच्या मॅट्रिमोनियल अॅपद्वारे दोघांची भेट झाली होती.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राजा रघुवंशीलसा संपवण्यासाठी मोठा प्लॅन

point

सोनमने प्रियकराला इंदोरमध्येच थांबायला सांगितलं

Sonam and Raja Honeymoon Case : मेघालयमधील शिलाँगमध्ये घडलेल्या एका घटनेची चर्चा देशभर सुरूय. इंदोरचा नवविवाहित तरूण राजा रघुवंशी याच्या हत्येच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आले आहेत. शिलाँग पोलिसांच्या मते, राजाची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी मिळून या खुनाचा कट रचला होता. सूत्रांनुसार, सोनमने अत्यंत चतुराईने आपल्या पतीला रस्त्यातून हटवण्याचा कट रचला. तिने राज कुशवाहला मारेकऱ्यांना शिलाँगला पाठवण्याची जबाबदारी सोपवली, पण त्याला स्वतःला इंदौरमध्येच राहण्यास सांगितलं. कुणाला संशय येऊ नये आणि पोलिसांच्या हाती लागण्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. 

...म्हणून राज कुशवाहला इंदोरमध्येच थांबवलं

राज कुशवाह शिलाँगला गेला असता, त्यामुळे कट लवकर उघडकीस आला असता. त्यामुळे सोनमने राजला इंदौरमध्येच ठेवून मारेकरी आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी यांना शिलाँगला पाठवायला सांगितलं. गाजीपूर ते पाटणा या दरम्यान सोनमला ट्रान्झिट रिमांडवर नेताना शिलाँग पोलिसांनी तिची चौकशी केली. यामध्ये तिने किती धुर्तपणे हा कट रचला हे समोर आलं. 

हे ही वाचा >> "खचून जाऊ नका...", हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, हॉटेल तिरंगाच्या मालकाचा सपोर्ट, म्हणाले...
 

सोनम आणि राजा यांचा विवाह याच वर्षी जानेवारी 2025 मध्ये झाला होता. रघुवंशी समाजाच्या मॅट्रिमोनियल अॅपद्वारे दोघांची भेट झाली होती. या अॅपच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा चर्चा झाली आणि 11 मे रोजी त्यांचा विवाह झाला. लग्नाच्या अवघ्या नऊ दिवसांनंतर, 20 मे रोजी दोघे हनिमूनसाठी शिलाँगला गेले. 23 मे रोजी नोंग्रियाट गावातील शिपारा होमस्टेमधून चेकआउट केल्यानंतर राजाची हत्या करून त्याचा मृतदेह वेईसावडॉन्ग धबधब्याजवळील खड्ड्यात फेकण्यात आला. 2 जून रोजी मृतदेह सापडला आणि 9 जून रोज स्करून पोलिसांनी तिच्याशी चौकशी केली. त्यावेळी सगळा कट उघड झाला. 

हे ही वाचा >> पत्नीनं भावांना हाताशी घेत पती अन् लेकाला संपवलं, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात...

सोनम आणि राजा यांचा विवाह याच वर्षी जानेवारी 2025 मध्ये रघुवंशी समाजाच्या मॅट्रिमोनियल अॅपद्वारे ठरला होता. या अॅपच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा चर्चा झाली आणि 11 मे रोजी त्यांचा विवाह झाला. लग्नाच्या अवघ्या नऊ दिवसांनंतर, 20 मे रोजी दोघे हनिमूनसाठी शिलांगला गेले. 23 मे रोजी नोंग्रियाट गावातील शिपारा होमस्टेमधून चेकआउट केल्यानंतर राजाची हत्या करून त्याचा मृतदेह वेईसावडॉन्ग धबधब्याजवळील खड्ड्यात फेकण्यात आला. 2 जून रोजी मृतदेह सापडला आणि 9 जून रोजी सोनमला गाजीपूर येथे पकडण्यात आले.

शिलाँग पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून सर्व आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची तयारी करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp