Govt Job: भारतीय हवाई दलात मोठ्या पदांसाठी बंपर भरती; काय आहे अर्जाची शेवटची तारीख?
भारतीय हवाई दलाने एकूण 284 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता काय आहे? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारतीय हवाई दलात बंपर भरती

भारतीय हवाई दलाकडून 284 पदांसाठी भरती जाहीर

काय आहे अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता?
Indian Air Force Recruitment: भारतीय हवाई दलाने फ्लाइंग ब्रांच आणि ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल) शाखेतील 284 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. महिला आणि पुरुष उमेदवार 1 जुलै 2025 पर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT)-02/2025 च्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल.
'या' पदांसाठी भरती
IAF च्या या भरतीद्वारे, फ्लाइंग आणि ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल) शाखांमध्ये 284 पदांच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये फ्लाइंग ब्रांचची एकूण 03 पदे भरली जातील. तसेच, ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल) पदासाठी 156 जागा आणि ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) पदांसाठी 125 जागा भरल्या जातील.
फ्लाइंग ब्रांच: 03 पदे
ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल): 156 पदे
- एरोनॉटिकल इंजी.(एल): 108 पदे
- एरोनॉटिकल इंजीनियर (मेकेनिकल): 48 पदे
ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल): 125 पदे
- वीपन सिस्टम ब्रांच: 24 पदे
- एडमिनिस्ट्रेशन: 58 पदे
- लॉजिस्टिक्स: 15 पदे
- अकाउंट्स: 11 पदे
- मेटरोलॉजी ब्रांच: 08 पदे
वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता
अर्जदाराचे वय 20 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, ग्राउंड ड्युटी टेक्निकल/नॉन-टेक्निकल पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 20 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावे. शैक्षणिक पात्रता त्या त्या पदांना अनुसरून असेल.
हे ही वाचा: मुंबईतील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये MBBS विद्यार्थ्याची आत्महत्या; नेमकं कारण काय?
अर्जाचे शुल्क आणि वेतन
या भरतीअंतर्गत, विविध पदांसाठी 56 हजार 100 ते 1 लाख 77 हजार 500 रुपयांपर्यंत वेतन असेल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 550 रुपये शुल्क भरावे लागेल. अर्जाचे शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरता येईल.
हे ही वाचा: आजीने बँकेतून 90 हजार रुपये काढले, नातवाने थेट तोंडात बोळा कोंबून... नांदेड हादरलं
निवड प्रक्रिया
भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रांच आणि ग्राउंड ड्युटीच्या या भरतीअंतर्गत, उमेदवारांना AFCAT परीक्षा द्यावी लागेल. ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) पदासाठी निवडीसाठी AFCAT परीक्षेसोबतच, अभियांत्रिकी ज्ञान चाचणी (EKT) देखील घेतली जाईल.