आजीने बँकेतून 90 हजार रुपये काढले, नातवाने थेट तोंडात बोळा कोंबून... नांदेड हादरलं
Nanded Crime News : नातवाने पैशांसाठी आजीच्या तोंडात बोला कोंबून तिची हत्या केली आहे. या हत्येनं नांदेड हादरून गेलं आहे. या प्रकरणात आरोपी नातवाला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पैशांसाठी नातवाने आजीला संपवलं

कारण ऐकूण तुम्हीही चक्रावून जाल
Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यात आजी आणि नातवच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नातवाने पैशांसाठी आजीच्या तोंडात बोळा कोंबून तिची हत्या केली आहे. मारोती उर्फ बाळू पांडुरंग वानखेडे वय वर्षे 35 असे नातवाचे नाव आहे. तर त्याने गयाबाई रामजी तवर वय वर्षे 75 असणाऱ्या आजीचा पैशांसाठी तोंडात बोळा कोंबून खून केला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी नातवाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हेही वाचा : पत्नीनं भावांना हाताशी घेत पती अन् लेकाला संपवलं, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात...
गयाबाई रामजी तवर या टेम्भुर्णी येथील रहिवासी आहेत. त्या एकट्याच राहत असून त्यांना नऊ एकर जमीन आणि घर आहे. त्यांच्या तीनही मुलींचा विवाह झाला असून त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. गयाबाईंनी सोमवारी बँकेतून 90 हजार रुपये काढले होते. तसेच त्यांनी आपल्या मुलीकडे असलेले 1 लाख 84 हजार रुपये किंमतीचे दागिणे घरी आणले होते.
घरातून मृतदेहाचा दुर्गंध
संबंधित प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी मारोतीने घरात प्रवेश करत आजीला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिचा खून केला. त्यानंतर घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. गुरूवारी रात्रीच्या सुमारास गयाबाईच्या घरातून मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागला. यामुळे गावकऱ्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आहे.
या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि गयाबाईंच्या मुलींना तसेच नातेवाईकांना घटनास्थळी उपस्थित राहण्यास सांगितलं. नातेवाईकांच्या उपस्थितीनंतर लोक घराचे दार उघडण्यात आले असता, घरात गयाबाईंचा मृतदेहा आढळून आला आहे. यावेळी पोलिसांनी घातपातीचा संशय व्यक्त केला आहे.