कसं ठरलं राजा आणि सोनमचं लग्न? राजाच्या आईकडून लग्नाबद्दलचे धक्कादायक खुलासे, "सोनमच्या कुटुंबियांनीच..."
पत्नीसोबत मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या राजाच्या हत्येच्या प्रकरणातील बऱ्याच धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आता राजाच्या आईने देखील सोनम आणि राजाचं लग्न कसं ठरलं, याबद्दल सांगितलं आहे आणि त्यासोबत आणखी खुलासे समोर येत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राजा आणि सोनमचं लग्न कसं ठरलं?

राजा-सोनमच्या लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा

राजाच्या आईकडून दोघांच्या लग्नाबद्दल खुलासे
Raja And Sonam Latest News Update : इंदौरमधील एक नवविवाहित जोडपं मेघालयात हनिमूनसाठी गेल्यानंतर त्यांची ही ट्रिप एक धक्कादायक मर्डर मिस्ट्री होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. या घटनेने संपूर्ण देशात एकच खळबळ माजली आहे. लग्नानंतर अवघ्या 19 दिवसांतच राजा रघुवंशी याचा मृतदेह एका खोल दरीत सापडला आणि त्याची पत्नी बेपत्ता असल्याचं समोर आलं. मात्र त्याची पत्नी म्हणजेच सोनम सापडल्यानंतर या घटनेबाबत आता नवीन खुलासे समोर येत आहेत.
या घटनेत प्रेम प्रकरण, कट आणि विश्वासघात यांचा मेळ असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, त्या दोघांचं लग्न कसं ठरलं, याबद्दल आता राजाची आई उमा रघुवंशी यांनी उघडपणे माध्यमांना सांगितले आहे. यासोबतच त्यांनी आणखी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
कसं ठरलं लग्न?
सोनम आणि राजाचं अरेन्ज मॅरेज असल्याचं राजाच्या आईने सांगितलं. त्यावेळी राजाची आई म्हणाली, "आम्ही स्वत:हून हे लग्न ठरवण्यासाठी गेलो नव्हतो. खरंतर, सोनमच्या कुटुंबाने राजाला आधी पाहिले होते. त्यांना सोनम आणि राजाची जोडी आवडली आणि त्यांनी लग्नाबद्दल बोलणी केली. दोन्ही कुटुंबांनी सहमती दर्शवली. त्यानंतर लग्न ठरवण्यात आलं आणि त्यांचं लग्न झालं."
गाजीपूरमध्ये सापडली सोनम
राजाच्या हत्येनंतर सोनमही गायब झाली होती. त्यानंतर अचानक एके दिवशी सकाली सोनमने तिच्या भावाला फोन केला आणि त्यानंतर ती गाजीपूरमधून सापडली. या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा: काय होता राजा-सोनमचा हनिमून प्लॅन? सोनमच्या सासूनं केला धक्कादायक खुलासा, "शिलाँगचं तिकीट.."
प्रेम प्रकरणाचा खुलासा
मेघालय पोलिसांच्या माहितीनुसार, राज कुशावाहा नावाच्या एका तरुणासोबत सोनमचे जुने प्रेम संबंध होते. त्यामुळे याच प्रेम प्रकरणामुळे राजाची हत्या करण्यात आली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. आता सोनमची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे आणि ती या हत्येच्या कटात सहभागी होती का? याबद्दल पोलीस जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे ही वाचा: "हॉटेल भाग्यश्री आज बंद...", म्हणून टोळक्याकडून तोडफोड, 70 हजारांचं नुकासन, मालक म्हणाले आता...
सोनमच्या चौकशीत बरेच खुलासे
मेघालय पोलिसांनी सोनमला ट्रान्झिट रिमांडवर घेतले आहे. तिची चौकशी केल्यानंतर ती हत्येत सहभागी आहे की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल. या संपूर्ण प्रकरणात राजाच्या हत्येशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना अजूनही मिळालेली नाहीत. सोनमची भूमिका, प्रकरणाचे सत्य आणि हत्येचे कारण याबाबत तपास सुरू आहे.