MPSC पेपर फुटी प्रकरणात मोठी बातमी, 'आदर्श' क्रीडा शिक्षक कसा सापडला?

मुंबई तक

MPSC drug inspector exam paper leak : एमपीएससी औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात फरार आरोपी मयूर ठाकरे याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. न्यायालयाने त्याला 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ADVERTISEMENT

MPSC drug inspector exam paper leak
MPSC drug inspector exam paper leak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

MPSC पेपर फुटी प्रकरणात मोठी बातमी

point

आदर्श क्रीडा शिक्षक कसा सापडला?

MPSC drug inspector exam paper leak, मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात फरार असलेल्या मयूर ठाकरे याला मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. नंदुरबारमध्ये क्रीडा क्षेत्रात आदर्श शिक्षक म्हणून ओळख असलेल्या मयूरला न्यायालयाने 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदासाठी 22 मार्च 2026 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वी ऋतुजा पाटील हिला प्रश्न मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले. तिच्याकडे मिळालेल्या प्रश्नांपैकी ७७ ते ७८ प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आले होते. याबाबत पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.

हेही वाचा : मावस मेहुण्याच्या प्रेमात पडली पत्नी, दोघांनी मिळून काढला पतीचा काटा, घरमालकावर आळ यावा म्हणून...

या प्रकरणात ऋतुजा पाटील हिच्या वडिलांचे नावही समोर आले आहे. अमृत पाटील यांनी प्रश्न मिळवण्यासाठी कौटिल्य अकादमीचा संचालक प्रवीण पाटील याला 12 लाख रुपये दिल्याची माहिती आहे. मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या पैशांचा या कामासाठी वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आर्थिक व्यवहाराबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, ऋतुजा पाटील हिने तिच्या मैत्रिणीशी केलेल्या व्हॉट्सअॅप संभाषणाचा स्क्रीनशॉट पोलिसांच्या हाती लागला. या संभाषणातून तपासाला नवी दिशा मिळाली. प्रश्न नेमके कसे मिळाले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे.