मुंबईची खबर: औषधासारख्या दिसणाऱ्या बाटलीत कपडे धुण्याचे लिक्विड... रक्ताची उल्टी करत सोडला जीव!

मुंबई तक

मुंबईतील एका 59 वर्षीय व्यक्तीला औषध घेताना केलेल्या छोट्याशा चुकीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.

ADVERTISEMENT

औषधासारख्या दिसणाऱ्या बाटलीत कपडे धुण्याचे लिक्विड... रक्ताची उल्टी करत सोडला जीव!
औषधासारख्या दिसणाऱ्या बाटलीत कपडे धुण्याचे लिक्विड... रक्ताची उल्टी करत सोडला जीव!
Google CTA

बातम्या हायलाइट

point

खोकल्याच्या औषधाऐवजी घेतले डाग घालवण्याचे लिक्विड

point

कपडे धुण्याचे लिक्विड प्यायल्याने मृत्यू

Mumbai News: आजारी असताना औषधांच्या बाबतीत झालेली चूक जीवावर बेतल्याच्या घटना पाहायला मिळतात. लहान मुलाने औषधाऐवजी चुकून वेगळंच द्रव्य प्यायल्याने त्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याचं बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल. मात्र मुंबईतील एका 59 वर्षीय व्यक्तीसोबत अशीच काहीशी घटना घडल्याचं समोर आलं आहे. औषध घेताना केलेल्या छोट्याशा चुकीमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. 

नेमकं काय घडलं? 

लोअर परळचा रहिवासी असलेल्या एका 59 वर्षीय लॉंड्रीचालकाने खोकल्याचे औषध समजून कपड्यांवरील डाग घालवण्यासाठीचं लिक्विड प्यायल्याने त्याला मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी घडली. या घटनेतील मृत व्यक्तीचं नाव सबाजित धोबी असल्याची माहिती मिळाली आहे. एन. एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

खोकल्याच्या औषधाऐवजी कपडे धुण्याचं लिक्विड...

मिळालेल्या माहितीनुसार, सबाजित धोबी हे लोअर परळ येथील दीपक सिनेमासमोरील चाळीत एकटेच राहत होते. त्याच ठिकाणी सबाजित लॉंड्रीचा व्यवसाय करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना खोकला झाला होता आणि त्यामुळे त्यांनी पालिकेच्या हॉस्पिटलमधून खोकल्याचे औषध आणले. 

औषधासारख्या दिसणाऱ्या बाटलीतून त्यांनी कपड्यांवरील डाग घालवण्याचे लिक्विड ठेवले होते. या दोन्ही बाटल्या त्यांनी बाजूबाजूला ठेवल्या होत्या.