कुख्यात गुंडावर कोयता, तालवारीने सपासप वार, हल्लेखोर गोल्डन मॅनसह 14 जणांवर... पनवेलचा रक्तरंजीत थरार

Panvel Crime :पनवेलमध्ये दहशत माजवणारा कुख्यात गुंड म्हणून राजकुमार म्हात्रेचं नाव चर्चेत आलं आहे. याच राजकुमार म्हात्रेवर एका पनवेलच्या खुटारी गावातील अनिकेत म्हात्रे या तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याची मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Panvel Crime
Panvel Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईला जोडलेल्या पनवेलमध्ये रक्तरंजीत थरार

point

पनवेलच्या कुख्यात गुंडावर प्राणघातक हल्ला 

point

कोण आहे पनवेल गोल्ड मॅन?

panvel crime : मुंबईला जोडलं गेलेलं शहर म्हणून पनवेलकडे पाहिलं जातं. पण याच पनवेल शहरात पुण्यातील गँगवॉरची पुनरावृत्ती होताना दिसते, ही घटना शनिवारी घडली. याच घटनेच्या दुसऱ्याच दिवशी कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये दोन टोळ्यांदरम्यान झालेल्या सशस्त्र हाणामारीने परिसर हादरून गेला होता. पोलिसांनी दोन्ही गटांवर तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि सोमवारी संशयितांना अटक केली आहे. या हाणामारीत दोघे जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय.

हे ही वाचा : बाईचा नाद लय बेकार! नर्तिकेच्या नादी लागला उपसरपंच, जमीन जुमला अन् सोनं नाणं सारंच लुटलं, अखेर स्वत:च्याच डोक्यावर बंदुक...

सराईत गुन्हेगार राजेश जेजुरकर आणि गोरख म्हात्रे या दोन्ही टोळ्यांदरम्यान पनवेलमध्ये वाद उफळला. हा वाद पूर्व वैमनस्यातून झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही गटांतील गुन्हेगारांना कोयते, तलवारीचा वापर करत मारहाण केली. यात राजेश जेजुरकर आणि आकाश नवघणे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पनवेलच्या कुख्यात गुंडावर प्राणघातक हल्ला 

दरम्यान, पनवेल परिसरत आणखी एक गंभीर चर्चा चर्चेत आली आहे. पनवेलमध्ये दहशत माजवणारा कुख्यात गुंड म्हणून राजकुमार म्हात्रेचं नाव चर्चेत आलं आहे. याच राजकुमार म्हात्रेवर एका पनवेलच्या खुटारी गावातील अनिकेत म्हात्रे या तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याची मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. याच अनिकेतची 'गोल्डन मॅन' म्हणून ओळख आहे. त्याने राजकुमार म्हात्रेला मारहाण केल्यानंतर हवेत गोळीबार केला होता.

हे ही वाचा : आईचे लेकीच्या बॉयफ्रेंडसोबत प्रेमसंबंध, पत्नी नवऱ्याचे दागिने चोरून बॉयफ्रेंडला द्यायची, नंतर मोठा प्लॅन रचत...

शिवाय तलवार, बंदूक आणि हॉकी स्टीकसारख्या प्राणघातक शस्त्राने हल्ला करत मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजकुमार म्हात्रेला पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनं पोलिसांनी अनिकेत म्हात्रेसह एकूण 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत म्हात्रे हल्ल्यानंतर फरार झाला आहे. या घटनेनं पनवेल परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp