राज्यात दहशत माजवणारी 'कोयता गँग' आहे तरी काय? जुन्या अंडरवर्ल्डसोबत काय आहे कनेक्शन? जाणून घ्या INSIDE स्टोरी

Koyta Gang : मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी वाढल्याचं काही घटनांच्या माध्यमातून समोर आलं आहे. कोयता गँगने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. शैक्षणिक हब म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहरात कोयता गँगची मोठी दहशत असल्याचं समजते.

ADVERTISEMENT

Koyta Gang Latest News Update
Koyta Gang Latest News Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोयता गँग कशाप्रकारे काम करते?

point

कोयता गँग आहे तरी काय?

point

कोयता गँगने पुण्यात माजवली दहशत

Koyta Gang : मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी वाढल्याचं काही घटनांच्या माध्यमातून समोर आलं आहे. कोयता गँगने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. शैक्षणिक हब म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहरात कोयता गँगची मोठी दहशत असल्याचं समजते. भर रस्त्यात कोयता घेऊन धिंगाणा घालणाऱ्या काही टोळ्यांच्या मुसक्याही पोलिसांनी आवळल्या आहेत. पण काही जण अजूनही दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. पण, ही कोयता गँग आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

काय आहे कोयता?

कोयता एक धारदार शस्त्र आहे. अशाप्रकारच्या शस्त्राचा वापर झाडी झुडपांमध्ये असलेल्या बांबूंना तोडण्यासाठी केला जातो. शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं शस्त्र आहे. सर्वच प्रकारचे शेतकरी त्यांच्या घरी अशाप्रकारचं शस्त्र ठेवतात. परंतु, काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कोयताचा वापर लोकांची हत्या करून दहशत माजवण्यासाठी केल्याचं उघडकीस आलं आहे. 

कोयता गँग कशाप्रकारे काम करते?

पुण्यात कोयता गँगने गुन्हेगारीची पाळेमुळे रोवली आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुण्यातील कोयता गँगचा इतिहास जास्त जुना नाहीय. ही गँग मागील 15  ते 20 वर्षांपासून पुणे आणि आसपासत्या परिसरात सक्रिय झाली आहे. कोयता गँगने अनेक ठिकाणी लोकांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. 

हे ही वाचा >> Uddhav-Raj Thackeray: 'तू परत ये.. मला भेटायला!', उद्धव ठाकरेंना 'शिवतीर्था'वर पुन्हा कोणी आणि का बोलावलेलं? अखेर आलं समोर!

कोयता गँग आहे तरी काय?

कोयता या धारदार शस्त्रावरून कोयता गँगचं नाव ठरवण्यात आलं आहे. कोयत्याच वापर विशेषत: शेतात केला जातो. पण या गँगने कोयत्याचा वापर गुन्हेगारी करण्यासाठी केला आहे. गँगमध्ये 18-25 वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. यामध्ये बेरोजगार तरुण, कॉलेज स्टुडंट्स आणि छोट्या-मोठ्या गुन्हेगारांचा समावेश आहे.

ही गँग मुंबईच्या जुन्या अंडरवर्ल्ड (छोटा राजन किंवा अरुण गवळी गँग) कडून प्रेरित झाली आहे. ही गँग लँड माफिया, एक्सटॉर्शन आणि दहशत माजवण्यासाठी काम करते. कोयता गँग सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ पोस्ट करून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. ही गँग वाहनांची तोडफोड, हिंसक हल्ले, दहशत पसरवणे आणि ड्रग्ज रॅकेटिंगचं काम करते. 

हे ही वाचा >> कुख्यात गुंडावर कोयता, तालवारीने सपासप वार, हल्लेखोर गोल्डन मॅनसह 14 जणांवर... पनवेलचा रक्तरंजीत थरार

कोयता गँगने पुण्यात माजवली दहशत

  • जुलै 2023 मध्ये एका कॉलेज कॅम्पसमध्ये कोयता गँगने विद्यार्थ्यांना धमकावलं होतं. धारदार शस्त्रांचा वापर करून दहशत पसरवली होती. त्यानंतर पोलिसांनी 9 लोकांना अटक केली होती.
  • जून 2024 मध्ये वडगाव शेरी, गणेश नगर पोलीस गाडीसह अनेक वाहनांची तोडफोड केली. कोयता आणि दगडांचा वापर वाहने फोडण्यासाठी करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाला होता, पण हल्लेखोर फरार झाले होते. 
  • जुलै 2025 मध्ये कोंढवा, गोकुलनगरच्या 7 तरुणांनी एका मुलावर कोयत्याने हल्ला केला होता. तो मुलगा गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर 7 लोकांना अटक करण्यात आली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp