मुंबईची खबर: मुंबई-पुणे महामार्गावरील ड्रीम प्रोजेक्टबाबत मोठी अपडेट, देशातील सर्वात मोठा बोगदा अन् अंतर सुद्धा...
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील 'मिसिंग लिंक प्रोजेक्ट'चे काम 94 टक्के पूर्ण झाले असून हा प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रोजेक्टमुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचं अंतर कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंक लिंक प्रोजेक्टला गती

देशातील सर्वात मोठा बोगदा

महामार्गावरील प्रवासाचं अंतर अर्ध्या तासाने कमी...
Mumbai News: मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील 'मिसिंग लिंक प्रोजेक्ट'चे काम 94 टक्के पूर्ण झाले असून हा प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रोजेक्टमुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचं अंतर कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक प्रोजेक्ट'मुळे मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, या एक्सप्रेसवेचं काम लवकरच पूर्ण होणार असून या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. या योजनेत एकूण 3 बोगद्यांचा समावेश करण्यात आला असून त्यातील एक 9 किमी लांब आणि 23 मीटर रुंद बोगदा आहे. हा देशातील सर्वात मोठा बोगदा ठरणार असून समृद्धी महामार्गाच्या बोगद्याला देखील मागे टाकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पाअंतर्गत 185 मीटर उंच पुलसुद्धा बनवण्यात येत आहे, जो देशातील सर्वात मोठा पुल असणार आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईत मिळणार स्वस्तात घर! 'MHADA' मध्ये निघाली मोठी लॉटरी, बघा तुमचा नंबर लागतोय का..
मार्गातील अंतर अर्ध्या तासांनी कमी होणार
मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील या 'मिसिंग लिंक प्रोजेक्ट'चं निरिक्षण केलं असता हा प्रोजेक्ट एका इंजिनीअरचा चमत्कार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या योजनेत देशातील सर्वात मोठ्या बोगद्याचा समावेश करण्यात येणार असून या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे मार्गातील अंतर अर्ध्या तासांनी कमी होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीने केली जात असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
हे ही वाचा: पत्नीचा पारा चढला! पतीच्या अंगावर फेकलं मिरची पावडरचं उकळतं पाणी.. बेडरूममध्ये घडलं तरी काय?
देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार 94 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल. प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या इंजिनीअर्स म्हणजेच अभियंते आणि कामगारांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. 'मिसिंग लिंक प्रोजेक्ट' च्या निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे आणि या प्रोजेक्टमुळे नक्कीच देशात क्रांतिकारी बदल होणार.
ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवासासाठी लागणारा वेळ अर्ध्या तासांनी कमी होणार आहे. तसेच या मार्गावरील घाट भागात वाहतूकीच्या समस्या सुटतील आणि अपघाताला सुद्धा आळा घालण्यास मदत होईल. या एक्सप्रेसवे मार्गावरील प्रोजेक्टमुळे इंधनाची बचत होईल आणि प्रदूषण कमी होऊन देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प ठरेल.