Swiggy बॉयचा मुंबईतल्या पावसात घोड्यावर बसून प्रवास, स्विगीने केलं महत्त्वाचं आवाहन

मुंबई तक

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस पडतो आहे. अशात एका स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. कारण हा डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी थेट घोड्यावर बसून गेला आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. ५ जुलै रोजी स्विगीने घोड्यावरून डिलिव्हरी करणारा हा डिलिव्हरी बॉय कोण आहे त्याला ओळखण्यासाठी स्विगीने आवाहन केलं आहे. या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस पडतो आहे. अशात एका स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. कारण हा डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी थेट घोड्यावर बसून गेला आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.

५ जुलै रोजी स्विगीने घोड्यावरून डिलिव्हरी करणारा हा डिलिव्हरी बॉय कोण आहे त्याला ओळखण्यासाठी स्विगीने आवाहन केलं आहे. या अज्ञात डिलिव्हरी बॉयला शोधण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. हा शूर तरूण स्टार कोण आहे? असं विचारण्यात आलं आहे. त्यावर स्विगीची खिल्लीही उवडली जाते आहे.

स्विगीने त्यांच्या निवेदनात काय म्हटलं आहे?

तो तुफान चालवत आहे की बिजली? त्याच्या पाठिला बांधलेल्या बॅगेत काय आहे? पावसाळ्याच्या दिवसात मुंबईचा गजबजलेला रस्ता ओलांडण्याचा तो एवढा निर्धार का करतो आहे? जेव्हा तो ऑर्डर डिलिव्हरी करायला गेला होता तेव्हा त्याने घोडा कुठे पार्क केला असेल? असे प्रश्न विचारले गेले आहेत. स्विगी वाइड हॉर्स हंट लाँच करण्यात आलं आहे. जो कुणही या बाबत माहिती देऊ शकेल त्याला स्विगी मनीमध्ये ५ हजार मिळतील अशीही घोषणा करण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp