नारायण राणेंविरोधात ठाकरे-शिंदे गटाची एकजूट, कोर्टही म्हणालं, चला इथं तरी…
नारायण राणेंसंबंधी एका प्रकरणात ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. जाणून घ्या 2005 सालचं नेमकं प्रकरण काय होतं आणि याबाबत कोर्टात काय घडलं.
ADVERTISEMENT

मुस्तफा शेख/भाग्यश्री राऊत, मुंबई: शिवसेना (Shiv sena) फुटली… एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वेगवेगळे झाले. शिंदेंना शिवसेना पक्षही मिळाला. दोन्ही गटातले नेते एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसतात. पण, याच दोन्ही गटातल्या शिवसैनिकांसह मनसेचे (MNS) नेतेही कोर्टात एकत्र आले आणि ते ही नारायण राणेंविरोधात. कोर्टात नेमकं काय घडलं? नारायण राणेंबद्दलचं ते 2005 साली घडलेलं प्रकरण काय होतं? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (narayan rane court matter case thackeray shinde group leaders gathering shiv sena mns mumbai latest news)
नारायण राणेंबद्दलचं ते प्रकरण काय होतं? याआधी एकमेकांवर टोकाची टीका करणारे शिवसैनिक कोर्टात एकत्र आले तेव्हा काय घडलं? हे सगळ्याता आधी पाहूयात. शिंदे आणि ठाकरे असे दोन गट झाल्यानंतर शिवसैनिक एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसतात. पण, हेच शिवसैनिक कोर्टात एकत्र आले होते. यावेळी आमचे प्रतिनिधी मुस्तफा शेख हे स्वतः कोर्टात हजर होते.
नारायण राणेंबाबतचं ‘ते’ प्रकरण काय?
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शिंदे गटात असलेले सदा सरवणकर, यशवंत जाधव, यांच्यासह ठाकरे गटातले अनिल परब, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह एकूण 38 शिवसैनिक कोर्टात हजर होते. अनिल परब आणि यशवंत जाधव यांच्यात चर्चा सुरू असलेलीही यावेळी पाहायला मिळाली, तर विशाखा राऊत आणि किरण पावस्कर यांच्याममध्ये कुजबूज चालली होती. ज्येष्ठ शिवसैनिक दगडू सपकाळ ज्यावेळी कोर्टात आले त्यावेळी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचा आदर केला. किरण पावस्करांनी तर पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये खेळीमेळीचं वातावरण दिसलं.
तरी किरण पावस्कर आणि अनिल परब यांनी सुनावणी संपेपर्यंत एकमेकांकडे साधं बघितलं सुद्धा नाही. दोन्ही गटातले शिवसैनिक कोर्टात एकत्र आल्यावर असं वेगळं चित्र पाहायला मिळालं. पण, ज्या प्रकरणात शिंदेंची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे नेते एकत्र आले ते नारायण राणेंबद्दलचं प्रकरण नेमकं काय होतं? ते ही समजून घेऊया.