Navale bridge accident : पुण्यातल्या नवले ब्रिजवर 48 वाहनांचा चक्काचूर कसा झाला? काय घडलं?

पुण्यातल्या नवले ब्रिजवर 48 वाहनांचा विचित्र अपघात, सात ते आठ जणांवर उपचार सुरू
navale bridge accident photos
navale bridge accident photos

वाहतूक कोंडीमुळे सातत्यानं चर्चेत असलेल्या पुण्यात रविवारी रात्री विचित्र अपघात झाला. पुणे-बंगळुरू जलदगती महामार्गावरील नवले ब्रिजवर झालेल्या या अपघातात 30 वाहनांचा चुराडा झाला. रविवारी (20 नोव्हेंबर) रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील अपघातांची मालिका कायम आहे. रविवारी (20 नोव्हेंबर) रात्री बाह्यवळण मार्गावरील नवले ब्रिजवर टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं 48 वाहनांचं प्रचंड नुकसान झालं. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात जखमी झालेल्यांपैकी 7 ते 8 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

नवले ब्रिजवरील अपघातात जखमी झालेल्यांची संख्या 35 ते 40 होती. दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्यां नागरिकांना उपचार केल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 7 ते 8 जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

navale bridge accident in pune
navale bridge accident in pune

पुण्यातल्या नवले ब्रिजवर अपघात का झाला?

पुण्यातील पुणे-बंगळुरू मार्गावरून वेगाने निघालेल्या टँकरचे ब्रेक निकामी झाल्यानं रात्री नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. टँकर काही वाहनांवर जाऊन आदळल्यानंतर इतरही वाहनं एकमेकांना धडकली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे पीएमआरडीए अग्निशमन दल, तसेच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि हेल्प रायडर्स संघटनेच्या स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

navale bridge accident on Pune-Bengaluru highway
navale bridge accident on Pune-Bengaluru highway

बचाव कार्य करणाऱ्या पोलीस आणि स्वयंसेवी नागरिकांनी अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात भरती केलं. टँकरच्या धडकेमुळे 48 वाहनांचं नुकसान झालं. या विचित्र अपघातात मोटारसायकल, असंख्य कार, रिक्षा आणि टेम्पोचं मोठं नुकसान झालं आहे. एकाच वेळी 48 वाहनं अपघातग्रस्त झाल्यानं मार्गावर मोठी कोंडी झाली होती.

पुणे-बंगळुरू रोडवरील नवले ब्रिजवरून टँकर मुंबईकडे वेगाने निघाला होता. नवले पुलाजवळ तीव्र उतारावर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर इतर वाहनांना धडकता देत रस्त्याच्या कडेला जाऊन टँकर धडकला. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने वाहनं बाजूला काढली, तर वाहनांत अडकलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आलं.

navale bridge accident : a tanker went on to hit at least 45 vehicles following a suspected brake failure.
navale bridge accident : a tanker went on to hit at least 45 vehicles following a suspected brake failure.

सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी यांनी अपघाताबद्दल सांगितलं की, 'नवले पुलाजवळ भरधाव टँकरनं धडक दिल्यानं 48 वाहनांचं नुकसान झालंय. अपघातात 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात कुणाचा मृत्यू न झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in