धनंजय मुंडे कारचा भीषण अपघात, छातीला लागला मार; मध्यरात्री काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारचा परळीत अपघातात... मुंडेंनी फेसबुकवरून दिली माहिती...
NCP leader Dhananjay munde injured in car accident
NCP leader Dhananjay munde injured in car accident

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या भीषण कार अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. मतदारसंघात गाठीभेटी घेऊन घरी परतत असतानाच परळी शहरात बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. स्वतः धनंजय मुंडे यांनीच अपघात कसा झाला, अपघाताचं कारण काय याबद्दल माहिती दिलीये.

मध्यरात्री घडलेल्या अपघातात धनंजय मुंडे यांच्या कारची अशी अवस्था झाली
मध्यरात्री घडलेल्या अपघातात धनंजय मुंडे यांच्या कारची अशी अवस्था झालीSadanand Ravindra Ghayal

धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केलीये. धनंजय मुंडे म्हणाले, "मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये."

NCP leader Dhananjay munde injured in car accident
दीपक केसरकरांनी 2024 मध्ये तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी -संजय राऊत
धनंजय मुंडे यांच्या कारचा पुढच्या काही भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याचं दिसत आहे.
धनंजय मुंडे यांच्या कारचा पुढच्या काही भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याचं दिसत आहे.Sadanand Ravindra Ghayal

या अपघातानंतर धनंजय मुंडे यांच्या कारचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये कारच्या पुढच्या काही भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याचं दिसत आहे. त्यावरुन हा अपघात अगदीच किरकोळ होता असं म्हणता येणार नाही.

NCP leader Dhananjay munde injured in car accident
Ahmadnagar : "बाहेरच्या लोकांनी येऊन..."; विखे पाटलांनी पडळकरांना फटकारलं
वाहन चालकांचा कारवरील ताबा सुटल्यानं धनंजय मुंडेंच्या कारचा अपघात झाला.
वाहन चालकांचा कारवरील ताबा सुटल्यानं धनंजय मुंडेंच्या कारचा अपघात झाला.Sadanand Ravindra Ghayal

सध्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, धनंजय मुंडे यांना दुपारी दोनच्या दरम्यान ॲम्बुलन्सद्वारे लातूरहून मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.

NCP leader Dhananjay munde injured in car accident
Sudhir मुनगंटीवार दिल्लीत जाणार?, भाजपमध्ये नव्या राजकारणाची सुरुवात
अपघातानंतर धनंजय मुंडे यांच्या कारची स्थिती दाखवणारा फोटो
अपघातानंतर धनंजय मुंडे यांच्या कारची स्थिती दाखवणारा फोटोSadanand Ravindra Ghayal

हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी सर्वपक्षीय आमदारांना रात्रीच्या वेळी प्रवास टाळण्याचं आवाहन केलं होतं. भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघाताचाही पवारांनी दाखला दिला होता. तसंच आपण सांगितल्यानंतर धनंजय मुंडेंनी रात्रीचा प्रवास थांबवल्याचंही सांगितलं होतं. गेल्यावर्षी रात्रीच्या वेळी प्रवास करतानाच विनायक मेटे यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in