राष्ट्रवादीतले नेते समोरासमोर! उमेश पाटलांनी राजन पाटलांविरुद्ध थोपडले दंड; म्हणाले, ‘…तर राजकारण सोडेन’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विजयकुमार बाबर, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातले दोन नेत्यांमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात सातत्यानं आरोप-प्रत्यारोप, आव्हान-प्रतिआव्हान दिलं जाताना बघायला मिळत आहे. राजन पाटील यांनी माझ्या कार्यकर्त्यासोबत निवडणूक लढवून जिंकून दाखवा, असं आव्हान दिलं होतं. त्यावर उमेश पाटलांनी प्रतिआव्हान दिलंय.

‘तुम्ही अनगर सोडा, मी नरखेड सोडतो. तालुक्यातून कुठूनही उभे राहा. तुमची दोन्ही पोरं सोडा, स्वतः राजन पाटलांनी निवडणुकीला उभं राहावं, यात जर मी पराभूत झालो तर तालुक्याचंच काय, जिल्ह्याचं राजकारण सोडेन. गोरगरीब कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक देऊन त्यांची घरं जाळण्याचा उद्योग बंद करा”, असं आव्हान उमेश पाटील यांनी राजन पाटलांना दिलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मोहोळ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान राजन पाटील यांनी ‘माझ्या कार्यकर्त्यांसोबत तुम्ही निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवा’, असं आव्हान उमेश पाटील यांना दिलं होतं. त्याला उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आव्हानं दिलं.

प्रकाश आंबेडकरांचं कौतुक, भाजपवर टीका : उद्धव ठाकरेंकडून शिवशक्ती-भीमशक्ती युतीचे संकेत

ADVERTISEMENT

राजन पाटील यांनीच आपल्या सोबत निवडणूक रिंगणात उतरण्याचे आव्हान उमेश पाटील यांनी दिलं आहे. ‘ते स्वतः सांगतात की, माझे वडील त्यांच्या वडिलांचे कार्यकर्ते होते आणि असे असताना ते त्या कार्यकर्त्यांच्या मुलाला ओळखत नसतील आणि स्वतःला तालुक्याचे नेते समजत असतील, तर आता जे त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. त्यांनी सुद्धा विचार करणं आवश्यक आहे”, असं उमेश पाटील म्हणाले.

ADVERTISEMENT

“असंस्कारी, चरित्रहीन, लोकांच्या विरोधात माझी लढाई आहे. ती मी लोकशाही मार्गाने लढणार आहे. जनतेला गृहीत धरून हे राजकारण करीत आहेत. हे तालुक्यातील जनतेनं पूर्णपणे ओळखलं आहे. याचा प्रत्यय कालच्या भीमा कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना आला आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही सर्वजण समविचारी एकत्रित येऊन लढणारा आहोत”, असं उमेश पाटील यांनी सांगितलं.

‘अशा लोकांना पक्षाने कापून फेकून दिलं पाहिजे’; उदयनराजे भोसलेंच्या संतापाचा कडेलोट

उमेश पाटलांकडून सातत्यानं टीका होत असल्यानं राजन पाटील राष्ट्रवादी नाराज असल्याचीही चर्चा सुरू झालीये. त्यांचे पुत्र अजिंक्यराणा आणि बाळराजे पाटील हेही नाराज असल्याचं समजतं. विरोधात बोलणाऱ्या पक्षातील लोकांना वरिष्ठ नेत्यांकडून बळ दिले जात असल्याचा आरोप पाटील गटाकडून सातत्यानं केला जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी राजन पाटील व त्यांच्या सुपुत्रांच्या कार्यशैलीवरच हल्ला चढवला असल्याचं राजन पाटील गटाकडून सांगितलं जातंय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT