परभणी : एसटी बसची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील तिघेजण चिरडले
Parbhani Accident : एसटी बस आणि दुचाकीदरम्यान भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, ज्यात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. ही दुर्दैवी घटना परभणी जिंतूर महामार्गालगतच्या कुक गावात घडली.
ADVERTISEMENT

1/4
देशभरात वाहन अपघाताच्या अनेक घटना होऊ लागल्या आहेत. या अपघातात अनेकांचे मृत्यू देखील होत आहेत. वाहतूक नियमांचे पालन करावे, असे देखील प्रशासन ओरडून सांगते. परंतु वाहतुकीच्या व्यवस्थापनेत किंचितसाही बदल होत नाही. दिवसेंदिवस वाहतुकीचा अपघात होताना दिसतो. असाच मन हेलावून टाकणारा धक्कादायक अपघात परभणी-जिल्ह्यातील जिंतूरमध्ये घडला.

2/4
घडलेल्या घटनेनुसार, एसटी बस आणि दुचाकीदरम्यान भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, ज्यात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. ही दुर्दैवी घटना परभणी जिंतूर महामार्गालगतच्या कुक गावात घडली.

3/4
एसटी बस ही राज्य परिवहन महामंडळाची एसटी परभणीकजून जिंतूरकडे जात होती, तेव्हा समोर येत असलेल्या मोटारसायकलवर तीन जण प्रवास करत होते. या घटनेदरम्यान दोघांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यात एकाला रूग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित केले.

4/4
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची पुढील कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे.









