Pune: भर चौकात नको ते करणाऱ्या गौरव अहुजाची कुंडलीच आली समोर, हा तर...
Pune Gaurav Ahuja: पुण्यात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव अहुजा याला अटक करण्यात आली आहे. पण आता त्याची अनेक गुन्हेगारी कृत्य समोर येऊ लागली आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गौतम अहुजाला साताऱ्यातून केलं अटक
पुण्यात चौकात केलेलं अश्लील कृत्य
गौतम अहुजा हा मोठा सट्टेबाज असल्याचा आरोप
पुणे: पुण्यातील गौतम अहुजा नावाच्या तरूणाने केलेल्या विचित्र कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण पुण्यात संताप व्यक्त केला गेला. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक तरुण रस्त्यावर बीएमडब्ल्यू कार थांबवतो आणि बाहेर पडतो. यानंतर तो सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करू लागतो. यासोबतच तरुण अश्लील कृत्ये देखील करतो. कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ शूट केला, जो व्हायरल झाला. त्यानंतर त्या तरुणाने एक व्हिडिओ जारी केला आणि आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली.
गौरव अहुजा तर मोठा सट्टेबाज
तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की, गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा हे बऱ्याच काळापासून जुगार आणि सट्टेबाजीच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. ते क्रिकेट बेटिंग, मटका आणि पोकर गेमसारखे बेकायदेशीर व्यवसाय चालवत होते. पुणे पोलिसांनी मनोज आहुजा आणि त्याच्या एका सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana: प्रचंड मोठी घोषणा, महिलांना मिळणार तब्बल 3000 रुपये!
गौरव अहुजा याने याआधी देखील गुन्हा केल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी क्रिकेट बेटिंगचं एक हाय प्रोफाईल रॅकेट उद्धवस्त केलं होतं. या रॅकेटमध्ये कॉलेजच्या अनेक मुलांना या बेटींगमध्ये ओढण्यात आलं होतं.
यामध्ये गौरव अहुजा याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. गौरव अहुजा आणि त्याचे वडील मनोज अहुजा यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्रिकेट बेटींग, खंडणी सारखे गुन्हे त्यांच्यावर असल्याचं आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलं आहे. मनोज अहुजा तुरुंगात देखील जाऊन आल्याचं कुंभार यांचं म्हणणं आहे.










