Pune: आईने पैसे दिले नाही, स्वप्निल पवारने जाळून टाकल्या 13 गाड्या.. पुण्यात चाललंय काय?
गुन्हेगारीच्या रोज घडणाऱ्या घटना पुणे पोलिसांच्या निष्क्रियतेला अधोरेखित करताना दिसतायत. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत तरूणानं अगदी क्षुल्लक कारणावरुन थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी जाळल्या. या घटनेत एक भलतंच कारण समोर आलंय.

बातम्या हायलाइट

आईने पैसे दिले नाही, म्हणून तरूणानं थेट गाड्या जाळल्या

सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या 13 गाड्या जळून खाक

तरूणाच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर समोर आला भलताच प्रकार
Pune Crime News : गाड्यांची तोडफोड, कोयता गँगचा हैदोस, गुन्हेगारांचे हवाबाजी करणारे रील्स...पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या थरारक घटना समोर येत आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या तरूणांकडून होत असलेल्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता पिंपरी चिचंवडमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरूणानं सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या डझनभर दुचाकी जाळून टाकल्याचं होत्या. त्या प्रकरणात आता धक्कादायक कारण समोर आलं आहे.
हे ही वाचा >>संतोष देशमुखांच्या हत्येचा जिथे कट रचला, तिथल्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब आला समोर, वाचून तुम्हीही जाल हादरून!
आईने ड्रग्जसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणाने सोसायटीत पार्क केलेल्या 13 दुचाकी जाळल्या. ही घटना सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सांगवी पोलिसांनी 27 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे निलख परिसरातून ही घटना उघडकीस आली आहे.
हे ही वाचा >>Haribhau Bagde : "अत्याचारी नराधमांना नपुंसक करुन टाका", शिवरायांच्या आदेशाचा उल्लेख केला, बागडे काय म्हणाले?
मोरया क्षितिज बिल्डिंगमध्ये स्वप्नील पवार कुटुंबासह राहतात. स्वप्नील हा उच्चशिक्षित आहे, मात्र त्याच्या व्यसनामुळे त्याला नेहमी ड्रग्जसाठी पैशांची गरज भासते. आईने पैसे न दिल्याने संतापलेल्या स्वप्नीलने पार्किंगमधील 13 दुचाकी जाळल्या. या घटनेनंतर सांगवी पोलिसांनी स्वप्नीलला अटक केली. स्वप्नील कुटुंबाला विनाकारण त्रास देत आहे आणि जीवे मारण्याची धमकी देत आहे, त्यामुळे त्याच्या आईने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.