काकीला आवडला पुतण्या, 'ते' फोटो पाहताच नवरा हादरला.. नेमकी घटना काय?
बिहारमध्ये एका दोन मुलांच्या आईने तिच्या भाच्यासोबत मंदिरात जाऊन लग्न केल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्रकरणातील पीडित पतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेल्या घटनेची माहिती सांगितली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन मुलांच्या आईचे भाच्यासोबत प्रेमसंबंध
मंदिरात केलं भाच्यासोबत लग्न अन्...
Crime News: बिहारमधील अमरपुर पोलीस स्टेशन परिसरातून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका दोन मुलांच्या आईने तिच्या भाच्यासोबत मंदिरात जाऊन लग्न केल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्रकरणातील पीडित पतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेल्या घटनेची माहिती सांगितली. पतीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नीने मंदिरात भाच्यासोबत लग्न करुन त्याचे फोटोज सुद्धा पतीच्या मोबाइलवर पाठवले. जाणून घ्या, सविस्तर प्रकरण.
मंदिरात भाच्यासोबत लग्न...
अमरपुर पोलीस स्टेशन परिसरातील रघुनाथपुर गावाचा रहिवासी असलेल्या शिवम नावाच्या तरुणाची पत्नी पूनम त्यांच्या दोन मुलांना सोबत घेऊन तिच्या भाच्यासोबत पळून गेली. त्यानंतर अंकित नावाच्या तिच्या भाच्यासोबतच पूनमने मंदिरात लग्न केलं. पीडित पतीच्या माहितीनुसार, मंदिरात लग्न केल्यानंतर पूनमने तिच्या पतीच्या मोबाइलवर लग्नाचे फोटो सुद्धा पाठवले.
मुलांसोबत अचानक बेपत्ता झाली
2014 मध्ये पूनम आणि शिवमचं लग्न झालं होतं. लग्नानंतर या दाम्पत्याला दोन मुलं झाली. लग्नानंतर त्यांचं सुरुवातीचं वैवाहित जीवन सुरळीत होतं. मात्र, कालांतराने त्यांच्या नात्यात अंतर वाढू लागलं. शिवम कुमारने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरी पूनमचा भाचा अंकितचं येणं जाणं वाढू लागलं. हळूहळू पूनम आणि अंकितच्या नात्यातील जवळीक वाढू लागली. त्यानंतर, दोन दिवसांपूर्वी पूनम तिच्या दोन मुलांसोबत घरातून अचानक बेपत्ता झाली.
हे ही वाचा: काकीच्या प्रेमात झाला वेडा, अनैतिक संबंध अन्... पण घरच्यांचा विरोध आणि तरुणाचा टोकाचा निर्णय..
मोबाइलवर पाठवले लग्नाचे फोटो
सोमवारी रात्री उशीरा शिवमच्या मोबाइलवर पूनमने काही फोटो पाठवले. ते फोटो पाहून शिवमला मोठा धक्का बसला. पूनमने तिच्या भाच्यासोबत म्हणजेच शिवमसोबत लग्न केल्याचे ते फोटो होते. फोटोसोबत पूनमने अंकितसोबत लग्न केल्याचा मॅसेजसुद्धा त्याला मिळाला.










