संतोष देशमुखांच्या हत्येचा जिथे कट रचला, तिथल्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब आला समोर, वाचून तुम्हीही जाल हादरून!

स्वानंद बिक्कड

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत अनेक हादरवून सोडणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र, आता मुंबई Tak च्या हाती लागलेल्या महत्वाच्या माहितीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचताना उपस्थित असलेल्या एकाचा जबाब समोर आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट

point

हत्या होताना ज्यानं पाहिली त्यानं जबाबात काय म्हटलं?

point

वाल्मिकचा आदेश, विष्णू चाटेचा निरोप, सुदर्शन घुलेचा शब्द... वाचा सविस्तर

Santosh Deshmukh Case Updates : संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला तीन महिने उलटून गेलेत.  संतोष देशमुखांना मारताना हसणारे आणि पाणी मागितलं म्हणून तोंडावर लघुशंका करणारे राक्षसी मनोवृत्तीचे आरोपी, सध्या तुरुंगात आहेत. पण यातील एक आरोपी कृष्णा आंधळे सध्या फरार आहे. तसेच या प्रकरणात SIT ने न्यायालयात चार्जशीट दाखल केलीये. या चार्जशीटमधील महत्त्वाचा जबाब मुंबई Tak च्या हाती लागलाय. वाल्मिक कराड कसा खंडणी गोळा करायचा, त्याच्यासाठी कोण कसं काम करत होतं, कोणाचा रोल काय होता हे समोर आलंय.

हे ही वाचा >> Haribhau Bagde : "अत्याचारी नराधमांना नपुंसक करुन टाका", शिवरायांच्या आदेशाचा उल्लेख केला, बागडे काय म्हणाले?

संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कुठे रचला? कुणी रचला? त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं. संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचताना जो व्यक्ती तिथे उपस्थित होता. त्यानं पोलिस जबाबात काय म्हटलंय, ते संभाषण अनेक प्रश्नांची उत्तरं देणारं आहे. SIT ने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सर्व तपास पूर्ण करुन न्यायालयात चार्जशीट दाखल केली. या चार्जशीटमध्ये जवळपास 180 पेक्षा जास्त जणांचा जबाब नोंदवण्यात आलाय. आता याच प्रकरणातला अत्यंत महत्वाचा आणि सुदर्शन घुलेच्या मित्राचा हा जबाब आहे. ज्या व्यक्तीने हा जबाब नोंदवला आहे, त्याने ओळख लपवली आहे. 

हत्येचा कट कुठे, कसा रचला? जबाबात काय म्हटलंय?

 

"सुदर्शन घुले हा कामानिमित्त अंबाजोगाईला येत होता. तेव्हा माझी माझ्या मित्रामार्फत सुदर्शनशी ओळख झाली. मागच्या 8 ते 10 वर्षांपासून माझी आणि सुदर्शन घुलेची ओळख आहे आणि जवळीक वाढल्याने आमची मैत्री झाली. त्यानंतर मी केजला गेल्यावर किंवा सुदर्शन माझ्या गावी आल्यावर आमची भेट व्हायची. तसंच माझ्या नावावर एक सिमकार्ड घेतलेलं, ते सुदर्शन वापरायचा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp