मोदींना ‘मन की बात’वरून डिवचलं; राहुल गांधी शेगावच्या सभेत काय बोलले?
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा विदर्भातून जात आहे. आज राहुल गांधींची संत गजानन महाराजांमुळे प्रसिद्ध असलेल्या शेगावमध्ये सभा झाली. यावेळी राहुल गांधींनी मन की बात वरून मोदींना डिवचलं. याच सभेत त्यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांसोबतचे अनुभव मांडले. राहुल गांधी शेगावच्या सभेत काय बोलले? संत गजानन महाराज की जय म्हणत राहुल गांधी भाषणाला सुरूवात केली. “70 दिवसांपूर्वी कन्याकुमारीपासून […]
ADVERTISEMENT

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा विदर्भातून जात आहे. आज राहुल गांधींची संत गजानन महाराजांमुळे प्रसिद्ध असलेल्या शेगावमध्ये सभा झाली. यावेळी राहुल गांधींनी मन की बात वरून मोदींना डिवचलं. याच सभेत त्यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांसोबतचे अनुभव मांडले.
राहुल गांधी शेगावच्या सभेत काय बोलले?
संत गजानन महाराज की जय म्हणत राहुल गांधी भाषणाला सुरूवात केली. “70 दिवसांपूर्वी कन्याकुमारीपासून ही यात्रा सुरू झाली. दररोज 25 किमी ही यात्रा चालते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाना, आंध्र आणि आता महाराष्ट्रात.”
“विरोधकांनी प्रश्न केला होता की, यात्रा कशाला हवी? यात्रेचा काय फायदा? देशाच्या कानाकोपऱ्यात आज भाजपने द्वेष आणि हिंसा पसरवली आहे. दहशत पसरवली आहे. जिकडे बघाल, तिकडे दहशत, द्वेष आणि हिंसा दिसेल. या तिरस्काराविरोधात ही यात्रा काढली आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांचं फडणवीस-शेवाळे यांना प्रत्युत्तर : वीर सावरकर यांचं ‘ते’ पत्र आणलं समोर