Ram Mandir: रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी करावेच लागणार ‘हे’ विधी!
जानेवारीची 22 तारीख जस जशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे अनेकांना राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्या कार्यक्रमाची रुपरेषा आता राम मंदिर ट्रस्टने जाहीर केली असून त्या विधिवत कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होणार आहे.
ADVERTISEMENT

Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला की, 70 एकरमध्ये पसरलेले राम मंदिर भक्तांसाठी खुलं केलं जाणार आहे. त्यामुळे या भव्यदिव्य कार्यक्रमाची सुरुवात म्हणजेच पूजा करण्याच्या सर्व विधी आजपासून सुरु केल्या जाणार असून त्या विधी 22 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहेत. त्यामुळे राम मंदिरामध्ये (Ram Mandir) होणाऱ्या 22 जानेवारी पर्यंत नेमका काय कार्यक्रम होणार आहे आणि कोणत्या दिवशी काय केले जाणार आहे त्याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
विधिवत कार्यक्रमाची रुपरेषा
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये 22 जानेवारी पर्यंत नेमकं काय काय होणार याची उत्सुकता सर्वच जनसामान्य माणसांना लागून राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या विधिवत कार्यक्रमाला आजपासून पूजा क्रियाकर्माचा कार्यक्रम होणार आहे.
हे ही वाचा >>Congress : पटोलेंविरोधात काँग्रेसमध्ये ‘धुसफूस’, केदार म्हणाले, ‘अन्याय झालाय’
असा होणार पुजेचा विधी
*16 जानेवारी रोजी प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजा होणार आहे.
*17 जानेवारीला पुतळा राम मंदिराच्या प्रांगणात दाखल होणार आहे.