संभाजी भिडेंचं ‘ते’ प्रचंड वादग्रस्त भाषण जसंच्या तसं…, शिंदे सरकार आता काय करणार?
स्वातंत्र्य दिन, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत याबाबत संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांचं पिंपरी-चिंचवडमधील भाषण जसंच्या तसं.
ADVERTISEMENT

पिंपरी-चिंचवड: आपल्या विधानाने नेहमी वाद निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांनी आता पातळी सोडून वाद निर्माण करणारं वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनाबाबत, झेंड्याबाबत आणि राष्ट्रगीताबाबत वादग्रस्त विधान संभाजी भिडेंनी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात केलं आहे. आता त्यांच्या याच विधानावरुन त्यांच्यावर शिंदे सरकार कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (sambhaji bhide controversial statement independence day national flag national anthem congress speech video pimpri chinchwad latest news today maharashtra)
मात्र, याआधी आपण जाणून घेऊयात संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले. वाचा त्यांचं पिंपरी-चिंचवडमधील भाषण.
संभाजी भिडेंचं ‘ते’ वादग्रस्त भाषण जसंच्या तसं…
‘आपण तिरंगी झेंडाच पत्करला पाहिजे. या समितीचा निर्णय यायच्या आधीच त्यांच्या टकुरीत काय आहे ते त्यांनी सांगून टाकलं. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये म्हणजे ऑल इंडिया &%$ कमिटीमध्ये तिरंगी झेंडा पत्करला गेला. बसा बोंबलत.. का गेला? ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकवून घेतलं आणि वंदे मातरम् म्हटलं.. ते गीतही तुमचं-आमचं राष्ट्रगीत नाही.’
‘जन-गण-मन अधिनायक जय हे.. भारत भाग्यविधाता.. पंचम जॉर्ज भ$ म्हणजे ब्रिटीश साम्राज्याचा राजा जो आमच्या देशात आला 1898 साली त्याच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोरांना सुचलेलं गीत.. काय लायकीचा देश, काय लायकीचे लोक.. काय लायकीचं स्वातंत्र्य.. आणि काय झेंडावंदन..’
‘उशीर झाला.. पण शिवबाने सांगावा धाडलाय रं.. याच्यावर ठाम निर्धाराने आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. या वर्षीपासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मान्य… कसं का असेना.. हांडगं स्वातंत्र्य असेल पण ते पत्करलं पाहिजे. आपण शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. आपण काय बुळगे नाहीत. ए सगळं दुरूस्त करू.. बदलेली गणितं सगळी दुरूस्त करून टाकू.’
‘यावर्षी पासून नऊच्या ठोक्याला भगवा झेंडा घेऊन गावाबरोबर गाढव खावं लागतं या हिशोबाने तिरंगी झेंडा… तो काही तीन आणि चार मीटरचा नको. उगं काय दखलपात्र असावं म्हणून.. आणि त्याची गीतं ठरवलीत पाच-सात.. त्याची पुस्तकंही छापली. ती गीतं गावोगावी द्या.. शिकवा. ती गीतं म्हणतच.. हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढून.. स्वातंत्र्य दिन साजरा करायचा..’










