NCP : “जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता”, शिंदेंच्या नेत्याचं स्फोटक दावा
Jayant Patil Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार होते, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
ADVERTISEMENT

– इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर
Sanjay Shirsat on Jayant Patil Maharashtra Politics : ‘जयंत पाटील हे शरीराने फक्त शरद पवारांसोबत आहेत. ते मनाने इकडे (अजित पवारांसोबत) आहेत’, असे सांगत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एक स्फोटक दावा केला. हा दावा करताना मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याच्या कारणाबद्दलही त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना मोठं विधान केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन राजकीय भूकंप झाले. या भूकंपानंतर महाविकास आघाडीतील दोन मोठ्या नेतेही महायुतीमध्ये जाणार, अशी चर्चा सातत्याने होत असते. यात एक नाव असतं अशोक चव्हाणांचं, तर दुसरं जयंत पाटील यांचं. काही दिवसांपूर्वी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण भाजपसोबत येणार असल्याचे विधान केले होते. त्यावर अशोक चव्हाणांनी खुलासा करत पडदा टाकला.
जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार?
शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत अजित पवारांनी बंड केलं. आमदारांचा मोठा गट घेऊन ते सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या बंडानंतर जयंत पाटील यांच्याबद्दलही अशाच चर्चा सातत्याने होत आहेत. या मुद्द्याने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. याला कारण ठरलं आहे संजय शिरसाट यांनी केलेलं एक विधान.