MLC election : तांबेंना मदतीचा हात! ‘मविआ’तील आमदारानेच दिला पाठिंबा

मुंबई तक

maharashtra legislative council election 2023 Latest update : विधान परिषद निवडणुकीसाठीचं महाविकास आघाडीची (Maha vikas aghadi) भूमिका अजूनही निश्चित झालेली नाही. मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीच्या बैठकांवर (MVA Meeting) बैठका सुरू आहेत. त्यामुळे सत्यजित तांबेंचं (satyajeet tambe) काय होणार? याची उत्सुकता सर्वांना आहे. दरम्यान, काँग्रेसनं समर्थन काढून घेतल्यामुळे एकाकी पडलेल्या तांबे पिता-पुत्राला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

maharashtra legislative council election 2023 Latest update : विधान परिषद निवडणुकीसाठीचं महाविकास आघाडीची (Maha vikas aghadi) भूमिका अजूनही निश्चित झालेली नाही. मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीच्या बैठकांवर (MVA Meeting) बैठका सुरू आहेत. त्यामुळे सत्यजित तांबेंचं (satyajeet tambe) काय होणार? याची उत्सुकता सर्वांना आहे. दरम्यान, काँग्रेसनं समर्थन काढून घेतल्यामुळे एकाकी पडलेल्या तांबे पिता-पुत्राला आता निवडणुकीत (Election 2023) मदत करणारा पहिला मित्र भेटला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा संधी दिली. सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सत्यजित तांबेंही निवडणूक लढवणार अशी माहिती पुढे आली आणि गोंधळ सुरू झाला.

डॉ. सुधीर तांबेंनी काँग्रेसकडून अर्ज भरलाच नाही. सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली, तर महाविकास आघाडीचा निवडणूक लढवण्याचा खेळ बिघडला. दुसरीकडे तांबे पिता-पुत्राच्या भूमिकेवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आणि सत्यजित तांबेंच्या पाठिंशी नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे सत्यजित तांबे एकटे पडल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता तांबेंना मदतीचा पहिला हात मिळाला आहे.

सत्यजित तांबेंना कपिल पाटलांनी दिला पाठिंबा

अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर सुधीर तांबे यांनी सत्यजित तांबे हे महाविकास आघाडीचेच उमेदवार असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर सत्यजित तांबेंनी सर्व पक्षियांनी पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, काँग्रेसनं सुधीर तांबेंचं निलंबन केलं आणि सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं होतं. दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी अधिकृतपणे पाठिंबा मागितलेला नसल्याचं सांगत भाजपनं यापासून स्वतःला दूर करून घेतलं. त्यामुळे सत्यजित तांबे निवडणूक कशी जिंकणार अशी चर्चा रंगलीये.

हे वाचलं का?

    follow whatsapp