PM मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील SPG कमांडोचा नाशिकमध्ये दुर्दैवी मृत्यू

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

PM Modi security convoy SPG Commando Ganesh Gite Death: सिन्नर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या ताफ्यातील सिक्युरिटीचे विशेष SPG कमांडो गणेश गीते ( SPG Commando Ganesh Gite) यांचा नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नरमध्ये (Sinnar) दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. कमांडो गीते हे सुट्टी घेऊन आपल्या नाशिकच्या त्यांच्या मूळ गावी आले होते. यावेळी सिन्नर तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर कालव्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. (sinner news SPG commando ganesh gite in pm modis security convoy tragically dies in nashik)

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी कमांडो गणेश सुखदेव गीते राहणार मेंढी गाव तालुका सिन्नर हे सुट्टी घेऊन आपल्या गावी आले होते. काल सकाळी आपल्या पत्नी रुपाली गीते आणि मुलगा, मुलीसह ते शिर्डी येथे साईबाबाचे दर्शन घेऊन घरी येत होते.

दरम्यान, घराजवळ 300 मीटरवरुन जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर उजवा कालव्यावरून घराकडे वळत असताना मोटरसायकलच्या पुढे टाकीवर बसलेल्या लहान मुलीचा पाय हँडलमध्ये अडकल्याने त्यांच्या गाडीचा तोल. त्यामुळे तिघेहीर बाइकवरुन थेट बाजूला असलेल्या पाटाच्या पाण्यात पडले. यावेळी कालव्याला पाणी देखील जास्त असल्याने सर्व जण पाण्यात बुडाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, हा अपघात पाहून आजूबाजूचे काही जण हे तात्काळ मदतीसाठी धावले. यावेळी एसपीजी कमांडो गणेश गीते यांनी पत्नी रूपाली गीते, सहा वर्षाची मुलगी आणि दीड वर्षाचा मुलगा यांना स्थानिकांच्या मदतीने पाण्यातून वर काढले. पण त्याचवेळी कॅनलला पाण्याचा वेग वाढल्याने त्यांना स्वत:ला पाण्याबाहेर येता आलं नाही. त्यामुळे ते त्याच पाण्यात वाहून गेले.

SPG जवानांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरण्यास सांगितले, कारण…

ADVERTISEMENT

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर रेस्क्यू टीम टीमने तत्काळ कार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. पण अधिक अंधार वाढत गेल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी पुन्हा एकदा पाटाच्या प्रवाहात बोटीच्या साहाय्याने गणेश गीते यांचा शोध घेण्यात आला. अखेर आज (10 मार्च) दुपारी 3 वाजेच्या सुमारास गणेश गीते यांचा मृतदेह एनडीआरएफच्या जवानांच्या हाती लागला. त्यानंतर संपूर्ण गीते कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला.

ADVERTISEMENT

या दुर्घटनेमुळे गणेश यांच्या पत्नी रुपाली यांना जबर धक्का बसला आहे. तर दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय देखील शोकसागरात बुडाले आहेत.

सोलापूर : शेत तळ्यात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू, आई-बाबा शेतावर गेल्यानंतर घडली घटना

गावकऱ्यांकडून संताप व्यक्त…

या घटनेची माहिती मिळाल्यानंतरही कालव्याचे पाणी का थांबविण्यात आले नाही? असा सवाल संतप्त गावकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. घटना घडल्यानंतर काही वेळातच प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र, तरीही कालव्याच्या पाण्याचा प्रवाह कमी झाला नाही. त्यामुळे गणेश यांचा शोध घेण्यात बरीच अडचण आली. अखेर आज दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला.

पालकमंत्री दादा भुसेंनी घेतली घटनास्थळी धाव

दरम्यान, या घटनेचं गांभीर्य ओळखून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दादा भुसे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात नाफेडची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही बैठक रद्द करून ते थेट घटनास्थळी पोहचले. जोपर्यंत बेपत्ता जवान सापडत नाही तोपर्यंत आपण स्वतः इथेच थांबणार असल्याचे दादा भुसे यावेळी म्हणाले. अखेर गणेश यांचा मृतदेह सापडल्यानंतर दादा भुसे यांनी संपूर्ण दुर्घटनेबाबत प्रचंड दु:ख व्यक्त केलं आहे.

वाढदिवस बेतला जीवावार! चार तरूणांचा बदलापूरजवळच्या कोंडेश्वर कुंडात बुडून मृत्यू

    follow whatsapp

    ADVERTISEMENT