12th fail : IPS मनोज कुमार शर्माचं महाराष्ट्र कनेक्शन, ‘या’ शहरांत होते अधिकारी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

12th fail movie vikrant massy ips manoj kumar sharma maharashtra connection kolhapur
12th fail movie vikrant massy ips manoj kumar sharma maharashtra connection kolhapur
social share
google news

अभिनेता विक्रांत मेस्सी स्टारर 12 वी फेल सिनेमाची खूप चर्चा आहे. हा सिनेमा आयपीएस अधिकारी मनोज शर्मा (IPS Manoj Sharma) यांच्या जीवनावर आधारीत आहे. मनोज शर्मा हे सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. या चित्रपटामुळे शर्मा यांची क्रेझ आणखीणच वाढली आहे. त्यात आता मनोज शर्मा यांचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. हे कनेक्शन नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात. (12th fail movie vikrant massy ips manoj kumar sharma maharashtra connection kolhapur)

12 वी फेल सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनेक माध्यमांनी आयपीएस मनोज शर्मा यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखती दरम्यान एबीपी माझाशी बोलताना मनोज शर्मा यांनी त्यांच्या महाराष्ट्र कनेक्शनची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यात तुमची पोस्टींग झाली आहे. असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर मनोज शर्मा म्हणाले, मी नांदेडला, गडचिरोली, चंद्रपुर, नागपूर, डीसीपी झोनमधून साऊथ मुंबईला आणि वांद्रयात बीकेसीला अॅडिशनल सीपी पदावर होतो अशी त्यांनी माहिती दिली.

हे ही वाचा : Uddhav Thackeray: ‘मी तेव्हा चूक केली… बापाची जहागिरी वाटते..’, कल्याणमध्ये ठाकरेंची श्रीकांत शिंदेंवर टीकेची झोड

कोल्हापूर शहर का आवडतं?

कुठल्या शहरातून बाहेर पडताना सर्वाधिक त्रास झाला? या शहरातूनच जावचं नाही असं वाटल? यावर मनोज शर्मा म्हणाले, मला अशी दोन शहरे वाटली. एक आहे ते कोल्हापूर. कोल्हापूरकरांची जी मानसिकता आहे ती माझ्या चंबल गावच्या लोकांसारखी आहे. त्यांच कसं आहे त्यांना कुठलाही माणूस चांगला वाटला म्हणजे वाटला. नाही वाटला तर तुम्ही काही करा तरी नाहीच वाटतं. कोल्हापूरची माणसं इतकी साधी आहेत की त्यांना एखादा व्यक्ती इमानदार वाटला तर त्याच्या मागे उभे राहतात, असे देखील मनोज शर्मा यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पानसरे हत्याप्रकरणाचे होते प्रमुख तपास अधिकारी

कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्याप्रकरणात मनोज शर्मा हे प्रमुख तपास अधिकारी होते. पानसरे यांच्या हत्येनंतर शर्मा यांनी अतिशय कुशलतेने ही परिस्थिती हाताळत तपास केला होता. केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असताना सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याला अटक करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल पुरोगामी चळवळीतील नेत्यांनी त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला होता.

हे ही वाचा : CM शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल, ‘बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण हे ‘घरगडी’

मनोज शर्मा यांनी 20 फेब्रुवारी 2014 मध्ये पोलीस अधिक्षकाचा पदभार स्विकारला होता. पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरापासून जवळ बदली, पोलिसांचे आरोग्य, पोलिसांच्या अडचणी यावर त्यांनी विशेष लक्ष देऊन पोलिसांची कार्यक्षमता वाढवली. सीसीचीएनएस, व्हॉट्सअॅपवर तक्रारी असे अनेक उपक्रम त्यांना राबवले. तसेच कोल्हापूर मटका व जुगार मुक्त केला होता, अशी अनेक कामगिरी त्यांनी केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT