Today Gold Rate: मुंबईसह देशातील 'या' प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव कडाडले! कारण वाचून धडकीच भरेल
Gold Rate In India: आज गुरुवारी 18 ऑक्टोबरला सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर गगनाला भिडल्याचं समोर आलं आहे. देशातील अनेक शहरांतील बुलियन मार्केटमध्ये करवा चौथआधीच सोन्याचे भाव वाढले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आजचे सोने-चांदीचे दर काय?
सोने-चांदीचे दर अचानक का वाढले?
मुंबईसह देशातील 'या' प्रमुख शहरांतील सोन्याचे दर भिडले गगनाला
Gold Rate In India: आज गुरुवारी 18 ऑक्टोबरला सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर गगनाला भिडल्याचं समोर आलं आहे. देशातील अनेक शहरांतील बुलियन मार्केटमध्ये करवा चौथआधीच सोन्याचे भाव वाढले आहेत. ज्वेलर्स सूत्रांच्या माहितीनुसार, सण-उत्सवात मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत उलथापालथ झाली आहे.
चांदीच्या किंमतीतही वाढ झाल्याची माहिती आहे. चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 96900 रुपयांवर पोहोचले आहेत. आज दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, लखनऊ आणि जयपूरसह उत्तर भारताच्या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 78,270 रुपयांवर पोहोचली आहे. आधीच्या दरांनुसार यात 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 71,760 रुपये झाला आहे.
भुवनेश्वर, मुंबई, कोलकाता
24 कॅरेट : प्रति 10 ग्रॅम, 78120 रुपये
22 कॅरेट : प्रति 10 ग्रॅम, 71610 रुपये
सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याचं कारण काय?
देशभरात सोन्याच्या किंमती अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची स्थिती आणि करन्सी एक्स्चेंज रेटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यास भारतीय बाजारावर याचा परिणाम होतो. तसच सण-उत्सवांच्या काळात वाढत्या मागणीमुळेही सोन्याच्या दरात चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळतं.









