Baba Siddique : ''मला गोळी लागलीय, मी आता...'', छातीत गोळ्या घुसल्यानंतर सिद्दीकींचे अखेरचे शब्द

मुंबई तक

Baba Siddique Murder Case Update : बाबा सिद्दीकी यांची ज्या ठिकाणी हत्या झाली होती. त्या ठिकाणापासून 250 मीटर अंतरावर पोलिसांना एक बॅग सापडली आहे. या बॅगेत पोलिसांना बाईक खरेदीची एक स्लिप सापडली होती. ही बाईक त्यांना या घटनेतील सातवा आरोपी असलेल्या हरिश निशादने घेऊन दिल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

गोळीबारानंतर 'हे' होते सिद्दीकींचे अखेरचे शब्द?
baba siddique last word after shootout murder case update mumbai crime brance lawrence bishnoi gang salman khan
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गोळीबारानंतर सिद्दीकींचे अखेरचे काय होते?

point

घटनास्थळावरून नागरीकांनी काय सांगितले

point

झिशान सिद्दीकींची पोलिसांकडून चौकशी सूरू

Baba Siddique Murder Case Update : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या गोळीबार प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता मुंबईच्या क्राईम ब्रांचने सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांची चौकशी सूरू केली आहे. या चौकशीत अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान झिशानच्या ऑफिसबाहेर ज्यावेळेस सिद्दीकींवर गोळीबार झाला. या गोळीबारानंतर सिद्दींकींचे अखेरचे शब्द काय होते? याची आता माहिती समोर आली आहे.  (baba siddique last word after shootout murder case update mumbai crime brance lawrence bishnoi gang salman khan) 

खरं तर दसऱ्याचा दिवस होता आणि बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा झिशानच्या ऑफिसबाहेर पडले होते. यावेळेस त्यांच्यासोबत झिशान देखील होता.मात्र त्याचवेळी झिशानला फोन आल्या कारणाने तो ऑफिसमध्ये पुन्हा गेला होता. याचवेळी शूटरना त्यांच्या चौथ्या साथिदारने कॉल दिला आणि त्यांनी बाबा सिद्दीकींवर तब्बल 6 राऊंड फायर केले होते. यापैकी दोन गोळ्या पोटात आणि एक सिद्दींकींच्या छातीत लागली होती. या गोळीबारानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, 'मला गोळ्या लागल्या आहेत, मला वाटत नाही की मी आता वाचू शकेन', असे अखेरचे शब्द सिद्दीकींच्या तोंडून बाहेर पडले होते. या संपूर्ण घटनेनंतर लगेचच झिशानने बाबा सिद्दीकी यांना लीलावती रूग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. 

हे ही वाचा : Lawrence Bishnoi: दाऊदचाच पॅटर्न, बाबा सिद्दीकींची सुपारी घेणारा लॉरेन्स बिश्नोई 'B' कंपनीच्या तयारीत?

''मला न्याय हवाय'' 

'माझ्या वडिलांनी गरीब आणि निष्पाप लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण करताना आपला जीव गमावला. आज माझे कुटुंब तुटले आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये आणि नक्कीच व्यर्थ जाऊ नये.मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे!, अशी मागणी एक्सवरून झिशान सिद्दीकी यांनी केली आहे. तसेच झिशानने आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांची त्याच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात भेट घेतली होती.

'त्या' बॅगेत काय सापडलं? 

दरम्यान बाबा सिद्दीकी यांची ज्या ठिकाणी हत्या झाली होती. त्या ठिकाणापासून 250 मीटर अंतरावर पोलिसांना एक बॅग सापडली आहे. या बॅगेत पोलिसांना बाईक खरेदीची एक स्लिप सापडली होती. ही बाईक त्यांना या घटनेतील सातवा आरोपी असलेल्या हरिश निशादने घेऊन दिल्याची माहिती समोर आली आहे. निशादने बाईक खरेदीसाठी लोणकर बंधूकडून  60 हजार रूपयांची मागणी केली होती. पण लोणकर बंधूंनी त्यांना पुण्यातून 32 हजारात जुनी बाईक खरेदी करून दिली होती, अशी माहिती आता तपासातून समोर आली आहे. याच बाईकचा वापर शुटर बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि ऑफिसची रेकी करण्यासाठी करत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp