2000 नोटाबंदी: भारतात पुन्हा 1000 रुपयांची नोट चलनात येणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

2000 demonetisation will rs 1000 note be circulated again in india
2000 demonetisation will rs 1000 note be circulated again in india
social share
google news

2000 note News: मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत 2000 रुपयांच्या नोटा (2000 Rs Notes) परत घेण्याबाबतचं परिपत्रक जारी केले आहे. या अंतर्गत बँक 2000 रुपयांच्या नोटा बाजारातून काढून घेईल आणि सप्टेंबर 2023 नंतर या नोटा चलनातून बाद होतील. RBI ने नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही तारीख निश्चित केली आहे. यासोबतच हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, लोकांनी घाबरून जाऊ नये, या नोटा पूर्वीप्रमाणेच बाजारात चालू राहतील आणि वैध राहतील, परंतु तुम्ही निश्चित तारखेपूर्वी बँकेत जाऊन त्या बदलून घेऊ शकता. (2000 demonetisation will rs 1000 note be circulated again in india)

ADVERTISEMENT

500 रुपयांची नोट सर्वात मोठी असेल?

आता प्रश्न असा आहे की 500 रुपयांची नोट आता सर्वात मोठी असेल का? जर आपण भारतीय रुपया प्रणालीवर नजर टाकली तर 2000 रुपयांची नोट ही आपल्या नोट प्रणालीतील सर्वात मोठं चलन होतं. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने फिकट गुलाबी रंगाची ही नोट जारी केली होती. चलन व्यवस्थेतील हा सर्वात मोठा बदल होता, कारण याआधी 1000 रुपयांचे चलन सर्वात मोठे चलन होते. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी केली तेव्हा त्यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या.

नव्या रंगातील 500 रुपयांची नोट आलेली चलनात

यानंतर 500 रुपयांची नोट नव्या रंगात परत आली होती तरी 1000 रुपयांच्या नोटेची जागा त्याच्या दुप्पट मूल्याच्या चलनाने घेतली होता. आता आरबीआयने शुक्रवारी क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत 2000 रुपयांची नोट परत घेण्याची घोषणा केली, तेव्हा आता फक्त 500 रुपयांची नोट चलन प्रणालीमध्ये सर्वात मोठी राहिली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> RBI: देशात पुन्हा नोटाबंदी… 2 हजारांच्या नोटा बंद होणार!, मोदी सरकारचा मोठा निर्णय

1000 रुपयांची नोट पुन्हा येणार बाजारात?

आरबीआयने 2000 रुपयांचे चलन काढून घेतले, मात्र आता 1000 रुपयांचे चलन पुन्हा सुरू होणार का? हा प्रश्न आहे. वास्तविक 1000 रुपयांचे चलन मोठे व्यवहार, बाजारातील खरेदी इत्यादींसाठी योग्य होते. त्यानंतर त्या बंद झाल्यावर मोठ्या चलनात 2000 रुपयांची नोट आली, मात्र या नव्या चलनाबाबत अनेक दिवसांपासून लोकांमध्ये संभ्रम होता. किंबहुना भारतीय जनता आणि मध्यमवर्गीय लोकांच्या विचारसरणीशीही त्याचा संबंध आला आहे. बचतीबाबत भारतीय नेहमीच सावध राहिले आहेत.

1000 च्या नोटा परत आल्यास आश्चर्य नाही: पी. चिदंबरम

1000 रुपयांच्या नोटा परत करण्यासंदर्भातील विधान माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘अपेक्षेप्रमाणे, सरकार/आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा काढून घेतल्या आहेत आणि नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे. 2000 रुपयांची नोट हे व्यवहाराचे लोकप्रिय माध्यम आहे. आम्ही हे नोव्हेंबर 2016 मध्ये बोललो होतो आणि आम्ही बरोबर सिद्ध झालो आहोत. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा मूर्खपणाचा निर्णय झाकण्यासाठी 2000 रुपयांची नोट ही एक बँड-एड होती. या दोन्ही नोटा व्यवहारासाठी लोकप्रिय आणि सर्वमान्य चलनं होत्या.’

ADVERTISEMENT

नोटाबंदीच्या काही आठवड्यांनंतर, सरकार/आरबीआयला 500 रुपयांची नोट पुन्हा चलनात आणण्यास भाग पाडले गेले. चिदंबरम म्हणाले की सरकार/आरबीआयने 1000 रुपयांची नोटही पुन्हा बाजारात आणली तर मला आश्चर्य वाटणार नाही. ते म्हणाले की, नोटाबंदीचे युग आले आहे.

ADVERTISEMENT

हळूहळू नोटा काढल्या जातील

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, आता 2 हजारांच्या नव्या नोटांची छपाई थांबवण्यात आली असून रिझर्व्ह बँक हळूहळू या नोटा काढून घेईल. सामान्य लोक 30 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही बँकेत 2-2 हजाराच्या नोटा जमा करू शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांना आधीच्या नोटाबंदीसारखी चिंता करावी लागणार नाही आणि आताही त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा वापरता येणार आहेत. RBI ने देशातील बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे.

हे ही वाचा >> 2000 notes: तुमच्याकडेही आहे 2 हजारांची नोट? घाबरू नका.. फक्त ‘एवढंच’ करा

2016 मध्ये झालेली नोटाबंदी

खरं तर, 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. सरकारच्या या निर्णयामुळे देशात बरीच खळबळ माजली होती, पण नंतर नव्या नोटा चलन बाजाराचा एक भाग बनल्या. सरकारने 200, 500 आणि 2 हजाराच्या नोटा बाजारात आणल्या होत्या. मात्र आता 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नोटाबंदीनंतर नेमकं काय झालेलं?

नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर पुढचे अनेक महिने देशात प्रचंड अराजकता माजली होती. जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी लोकांना लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागलेले. नोटाबंदीच्या घोषणेनंतर अशी अनेक प्रकरणेही समोर आली होती की, चलनातून बाद झालेल्या नोटा ज्यांचे मूल्य हे कोट्यवधींच्या रकमेचं होतं, त्या कधी नदीत तर कधी कचऱ्यात गेल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र यावेळी 2 हजाराची नोट तात्काळ चलनातून बाद झाली नसल्याने लोकांना त्याची चिंता करण्याची गरज नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT