समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे ‘ते’ 4 आरोप, CBI ची खळबळ उडवून देणारी FIR
Sameer Wankhede: आर्यन खान ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जे खळबळजनक आरोप केले होते तेच आरोप सीबीआयच्या FIR मध्ये देखील असल्याचे आता पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

Sensational FIR of CBI against Sameer Wankhede: मुंबई: एनसीबी (NCB) अर्थात अंमली पदार्थ विरोधी विभागाचे मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे भ्रष्टाचार प्रकरणात चांगलेच अडकण्याची शक्यता आहे. 25 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सीबीआयने (CBI) समीर वानखेडेंसह इतर काही जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे प्रकरण घडलं तेव्हा नवाब मलिकांनी वानखेडेंवर काही आरोप केले होते. त्यातले बरेच आरोप सीबीआयच्या FIR मध्ये दिसतात. सीबीआयने FIR मध्ये नेमकं काय म्हटलं? मलिकांचे आरोप खरे ठरलेत का? हेच जाणून घेऊयात (4 allegations made by nawab malik against sameer wankhede and the sensational fir of cbi)
-
नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवरील आरोप क्रमांक 1
नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर 25 कोटी रुपये खंडणीचा आरोप केला होता. तो आरोपही या सीबीआयच्या FIR मध्ये आहे. यात म्हटलं आहे की, शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन समीर वानखेडेंनी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. शेवटी हे प्रकरण 18 कोटी रुपयांवर सेटल करण्यात आलं. के. पी. गोसावी आणि सॅम डिसोजा यांनी 50 लाख रुपयांचं टोकन अमाऊंटही घेतलं, असं या FIR मध्ये म्हटलं आहे.
-
नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवरील आरोप क्रमांक 2
दुसरं महत्वाचं म्हणजे, मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंनी कार्डीलिया क्रूझवर छापेमारी केली. त्यावेळी फक्त ठराविक लोकांवर कारवाई केली आणि काही जणांना सोडून देण्यात आलं, असा आरोपही नवाब मलिकांनी केला होता. हाच आरोप CBIने देखील केला आहे. समीर वानखेडे, इंटलिजन्स ऑफीसर आशिष रंजन आणि व्ही. व्ही. सिंह यांच्या निरीक्षणाखाली ही कारवाई करण्यात आली. क्रूझवर छापेमारी केल्यानंतर पहिल्यांदा 27 आरोपींची नाव नोंदवण्यात आली. पण, नंतर त्यात दुरुस्ती करून 17 जणांना सोडून देण्यात आलं आणि फक्त 10 जणांची नोंद करण्यात आली.
हे ही वाचा >> Husband-Wife: ‘नवऱ्याने बेडरूममध्ये लावलाय CCTV कॅमेरा’, बायको म्हणाली; त्याला…
इंटलिजन्स ऑफिसर आशिष रंजन यांनी कार्डिलिया क्रूझवर NDPS अॅक्टअंतर्गत जी कारवाई केली. त्यावेळी संशयित अरबाज मर्चंटने मान्य केलं होतं की त्याच्याकडे चरस आहे आणि त्यानं चरस आशिष रंजन यांना दिलं देखील होतं. इतकंच नाहीतर सिद्धार्थ शाहवर अरबाज मर्चंटला ड्रग्स पुरवल्याचा आरोप होता. तसेच ड्रग्ससाठी अरबाजकडून पैसे घेतल्याचं त्यानं मान्य केलं होतं. सिद्धार्थनं स्वतः ड्रग्सचं सेवन केलं होतं, हेही त्याच्या चॅटमधून समोर आलं होतं. तरीही सिद्धार्थ शाहला सोडून देण्यात आलं.