Nanded: रुग्णालय परिसरात डुक्करांनी घेतला तरुणाचा जीव, लचके तोडले अन्…
Nanded : नांदेडमधील शासकीय रुग्णालय परिसरात डुक्करांनी केलेल्या हल्ल्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना नुकतीच घडली आहे. यावेळी डुक्करांनी मयत व्यक्तीच्या शरीराचे लचके तोडल्याचंही यावेळी समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

Men died in an attack by pigs: कुवरचंद मंडले, नांदेड: नांदेडमध्ये (Nanded) 24 तासात नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाल्याने शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा चव्हाट्यावर आली होती. या घटनेनं संपूर्ण राज्यच हादरलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्याला हादरवणारी घटना घडली आहे. शासकीय रुग्णालय परिसरात डुक्करांनी एका रुग्णावर हल्ला चढवत त्याच्या शरीराचे लचके तोडून त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. (a patient died in an attack by pigs in the premises of a government hospital in nanded)
ही मन हेलावून टाकणारी घटना शनिवारी (11 नोव्हेंबर) शासकीय रुग्णालय परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेने रुग्णालयात आरोग्य सेवेसोबतच तेथील डुकरांच्या होणाऱ्या त्रासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तुकाराम नागोराव कसबे (वय 35 वर्ष) असं मयत व्यक्तीचं नाव आहे.
नेमकं काय घडलं?
मयत तुकाराम कसबे हा नांदेड शहरालगत असलेल्या धनगरवाडी येथील रहिवासी होता. त्याला काही दिवसांपासून टीबीची लागण झाली होती. त्यामुळे 30 ऑक्टोबर रोजी त्याला त्याच्या नातेवाईकांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
हे ही वाचा>> UBT: ‘…तर आम्ही तुम्हाला दिवसा फाडू’, ठाकरेंचा नेता
तुकारामच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर 9 नोव्हेबर रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आलं. त्यानंतर तुकाराम याने परभणी येथे मामाच्या घरी जातो म्हणून घरून निघून गेला. पण तो मामाकडे न जाता पुन्हा रुग्णालयात गेला. यावेळी तो दिवसभर रुग्णालय परिसरात फिरत राहिला.