Mumbai Weather Update: मुंबई, महाराष्ट्रातील पावसाचा नेमका अंदाज, पुढील 24 तासात कुठे-कुठे बरसणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

पुढील 24 तासात महाराष्ट्रात कुठे-कुठे बरसणार?
पुढील 24 तासात महाराष्ट्रात कुठे-कुठे बरसणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत पुढील 24 तासात कसा असेल पाऊस

point

महाराष्ट्रात हवामानाबाबत नेमका अंदाज काय?

point

पाऊस कुठे-कुठे बरसणार?

Maharashtra Weather Update: मुंबई: यंदा मान्सून महाराष्ट्रात दमदारपणे सक्रीय झालेला नाही. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देखील पाऊस हवा तसा बरसलेला नाही. मागील दोन दिवसात मुंबई आणि कोकणात काही भागात काहीसा मुसळधार पाऊस झाला. मात्र, मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने काहीशी दडी मारली आहे. आता पुढील 24 तासात देखील मुंबई आणि महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणीच मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (accurate forecast of rain in mumbai and maharashtra weather news meteorological department weather forecast for next 24 hours 11th july 2024)

महाराष्ट्र हवामान अपडेट (Maharashtra Weather Alert) 

हवामान खात्याने मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हवामानाचे अंदाज वर्तवले आहेत. जाणून घ्या त्याविषयी सविस्तरपणे. 

मुंबई आणि उपनगरात पावसाच्या मध्यम सरी

मुंबईत गेल्या 24 तासांत तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची नोंद झाली आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज असा की, शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मधूनमधून मध्यम पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 25°C च्या आसपास असेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Maharashtra Weather Forecast : मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार!

कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता 

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 आणि 11 जुलै 2024 रोजी कोकण आणि गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार (64.5-115.5 मिमी) ते खूप मुसळधार (115.5-204.4 मिमी) पावसाची जोरदार शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता 

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 12-14 जुलै 2024 दरम्यान मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार (64.5-115.5 मि.मी.) ते अतिशय मुसळधार पाऊस (115.5-204.4 मि.मी.) होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Mumbai Local Train Suicide: पिता-पुत्राने ट्रेनसमोर उडी मारली अन्.. हादरवून टाकणारा VIDEO

मराठवाड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

विदर्भातही मध्यम पावसाची शक्यता 

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज पाहासाठी View PDF  इथे क्लिक करा 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT