Mumbai-Pune Weather Update: मुंबई-पुण्यात पावसाचा कहर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट
Maharashtra Weather Update: मुंबई आणि पुण्यात मागील काही तासांपासून प्रचंड मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जाणून घ्या पावसाचे संपूर्ण अपडेट
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई-पुण्यात तुफान पाऊस

पुण्यात अतिमुसळधार पावसाने पूरस्थिती

पुण्यातील खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले
Mumbai Pune Rain Weather Update: मुंबई: मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात आज (25 जुलै) मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये पुढील 3 ते 4 तास अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे मुंबईत धो-धो पाऊस सुरू असताना दुसरीकडे पुण्यात अक्षरश: ढगफुटी सदृश पाऊस झाल्याची माहिती मिळते आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तुफान पावसाने पुणं पाण्याखाली...
हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील सर्व शाळा आज (25 जुलै) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
हे ही वाचा>> Mumbai Rain: मुंबईत पावसाचा प्रचंड धुमाकूळ; लोकल ट्रेनचं काय झालंय?
खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.