Aditya-L1 Mission : ISRO ने दिली गुड न्यूज! सूर्याच्या दिशेने भारताचं आणखी एक पाऊल

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Aditya-L1 Successfully Changed its Orbit for Second Time : भारतीय अंतराळ संस्थेने (ISRO) सौर मोहिमेवर पाठवलेल्या आदित्य-L1 बाबत एक मोठं अपडेट दिलं आहे. शनिवारी (2 सप्टेंबर) प्रक्षेपित झाल्यानंतर, इस्रोने मंगळवारी (5 सप्टेंबर) सकाळी ट्विट केलं की, आदित्य-एल1 ने दुसऱ्यांदा यशस्वीरित्या आपली कक्षा बदलली आहे. पुढे असंही म्हटलं आहे की, आदित्य-एल1 च्या ऑर्बिट चेंज ऑपरेशन दरम्यान, बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअरमधील सॅटेलाइटद्वारे त्याला ट्रॅकही करण्यात आलं आहे. (Aditya-L1 Mission Successfully Replaces Second Orbit ISRO’s New Update)

ADVERTISEMENT

आदित्य L-1 आता 245 किमी x 22459 किमी कक्षेवरून 282 किमी x 40225 किमीवर गेले आहे. आदित्य एल-1 चे हे दुसरे मोठे यश असून त्याने आपले पाऊल सूर्याकडे वळवले आहे. आता 10 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 2:30 वाजता आदित्य-L1 ची कक्षा पुन्हा तिसऱ्यांदा बदलली जाईल.

Exclusive:मराठवाड्यातील मराठ्याना OBCतून आरक्षण शक्य आहे का? गिरीश महाजन म्हणाले…

सूर्य मिशनच्या कार्यपद्धतीनुसार, आदित्य-एल 1 ला पृथ्वीभोवती 16 दिवस फिरायचे आहे, त्यानंतरच तो सूर्याच्या दिशेने त्याच्या मार्गावर जाईल. आदित्य L-1 16 दिवसांत पृथ्वीची कक्षा पाच वेळा बदलणार आहे. इस्रोच्या अपडेटनुसार, 5 दिवसांनी त्याची कक्षा पुन्हा बदलली जाईल.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी (2 सप्टेंबर) इस्रोने सतीश धवन स्पेस सेंटरमधून आदित्य-L1 मिशनचे प्रक्षेपण केले होते. तीन दिवसांत तिसऱ्यांदा हा बदल त्याच्या कक्षेत झाला आहे.

आदित्य-L1 चं मुख्य लक्ष कोणतं?

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य-एल1 चांगल्या स्थितीत प्रवास करत आहे. सध्या ते 18 सप्टेंबरपर्यंत पृथ्वीभोवती चार वेळा आपली कक्षा बदलेल. पुढील ऑर्बिट मॅन्यूवरिंग 10 सप्टेंबरच्या रात्री होईल. एकदा आदित्य त्याच्या निश्चित स्थळावर पोहोचला म्हणजे तो L1 ला पोहोचेल. मग तो दररोज 1440 फोटो पाठवेल.

ADVERTISEMENT

Pankaja Munde : अजित पवारांना भाजपने सोबत घेण्यामागे ‘हे’ कारण, पंकजा मुंडेंनी सगळंच सांगितलं

हे फोटो आदित्यमध्ये बसवण्यात आलेला व्हिजिबल एमिशन लाइन कोरोनाग्राफ (VELC) काढेल. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये पहिला फोटो मिळेल असं मानलं जात आहे. VELC ची निर्मिती इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्सने केली आहे. सूर्ययानमध्ये स्थापित व्हीईएलसी सूर्याचे एचडी फोटो घेईल. या पेलोडमध्ये बसवलेला कॅमेरा सूर्याची हाय रिझोल्यूशनचे फोटो घेतो.

ADVERTISEMENT

आदित्य-L1 ची कक्षा पुन्हा-पुन्हा बदलली जात आहे, जेणेकरून तो 15 लाख किमीचा लांबचा प्रवास पूर्ण करू शकेल इतका वेग गाठू शकेल. हा प्रवास पूर्ण केल्यानंतर, जेव्हा आदित्य L1 निश्चित बिंदूवर पोहोचेल, तेव्हा त्याचे सर्व पेलोड्स चालू होतील. म्हणजे त्यात बसवलेली सर्व उपकरणं सक्रिय होतील. तो सूर्याचा अभ्यास सुरू करेल.

Kalwa Crime: चारित्र्याचा संशय अन् हत्येपूर्वी फोन कॉल, प्रमिला साळवी यांच्या हत्येमागची थरारक कहाणी

Aditya-L1 किती दिवस काम करेल?

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पाच वर्षांसाठी आदित्य-एल1 मोहिमेची योजना आखली आहे. पण जर ते सुरक्षित राहिले तर ते 10-15 वर्ष काम करू शकते. सूर्याशी संबंधित डेटा पाठवू शकते. पण यासाठी आधी सुरक्षित राहून निश्चित केलेले L1 ठिकाण गाठणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT