MNS: मनसेचं पुन्हा खळ्ळखट्याक, परप्रांतीयांना बेदम चोपलं; नेमकं काय घडलं?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

after beating marathi youth by hawkers mns workers also beat up hawkers incident in kalyan
after beating marathi youth by hawkers mns workers also beat up hawkers incident in kalyan
social share
google news

MNS workers also beat up hawkers: कल्याण : कल्याणमधील स्कायवॉकवर परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी दिवसागणिक वाढत चालली आहे. ज्यामुळे आता पुन्हा एकदा मनसेकडून ‘खळ्ळखट्याक’ सुरू झालं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांना चांगलाच चोप दिल्यानंतर आता पुन्हा एकदा मनसे विरुद्ध परप्रांतीय असा वाद रंगला आहे. (after beating marathi youth by hawkers mns workers also beat up hawkers incident in kalyan)

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय घडली?

शहापूर तालुक्यातील वाशिंद येथे राहणारा एक तरुण काही कामानिमित्त कल्याणमध्ये आला होता. त्यावेळी स्कायवॉकवरील फेरीवाल्याकडून काही वस्तू तो खरेदी करत होता. मात्र ती वस्तू खराब असल्याने त्याने ती परत करत पैसे मागितले. यावेळी या तरुणाचा किशोर परिहार या फेरीवाल्यांशी वाद झाला. या फेरीवाल्यांनी त्याला मराठी लोग ऐसे क्यो होते हैं? म्हणत हिणवले तर चार ते पाच फेरीवाल्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केली.

हे ही वाचा >> Nanded : नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूचा थयथयाट! 12 नवजात बालकांसह 24 रुग्णांचा मृत्यू

ज्यानंतर मारहाण झालेल्या तरुणाने याबाबत तात्काळ मनसे कार्यकर्त्यांना माहिती दिली. मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणाला हिणवून मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांना बेदम चोप दिला. ज्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे कल्याण स्कायवॉकवर बसणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली.

हे वाचलं का?

दरम्यान पुन्हा मराठी मुलांना मारहाण केल्यास मनसे स्टाईलनेच त्यांना उत्तर देऊ असा इशारा देखील मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

फेरीवाल्यांनी केली तरुणाला मारहाण

वाशिंदमध्ये राहणारा 21 वर्षीय कैलास दनके हा विध्यार्थी कल्याणातील काम आटोपून परत जात असताना त्याने कल्याणच्या स्कायवॉकवर बसलेल्या किशोर परिहार या फेरीवाल्यांकडून 20 रुपये किमतीचे हॅन्ड बेल्ड घेतले व फेरीवाल्यांना दोनशे रुपये दिले. मात्र, उरलेले पैसे मागितले असता फेरीवाल्याने ते देण्यास नकार देत मराठी माणसं अशीच असतात असे बोलू लागला.

ADVERTISEMENT

यावेळी त्याने मराठी भाषेवर उद्धटपणे बोलण्यास सुरूवात केली. यावेळी कैलासने भाषेविषयी बोलू नको, नाहीतर मनसे कार्यकर्त्यांना सांगेल. असे सांगितले.. त्यावेळी फेरीवाल्यांनी ‘मनसे किंवा राज ठाकरेला आणलं तरी आम्ही घाबरत नाही.’ असे म्हणत कैलासला स्टेशनवरच बेदम मारहाण केली.

ADVERTISEMENT

यानंतर कैलास कल्याण पूर्वेतील मनसे कार्यालयामध्ये जाऊन आपल्याबरोबर घडलेली घटना कार्यकर्त्यांना सांगितली. यावेळी कार्यकर्त्यांनी तात्काळ स्टेशन परिसरात आले आणि फेरीवाल्याचा शोध घेतला. यावेळी फेरीवाल्यांनी देखील मनसे कार्यकर्त्यांनाही उद्धट बोलत त्यांच्याबरोबर धक्काबुक्की सुरू केली. ज्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्या फेरीवाल्याला चांगलाच चोप देत थेट कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केलं.

हे ही वाचा >> Fact Check: लंडनमधील ‘ती वाघनखं’ खरंच शिवाजी महाराजांनी वापरलेली, काय आहे सत्य?

याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यावेळी मराठी भाषेचा, मराठी तरुणांचा अपमान सहन करणार नाही पुन्हा परप्रांतीय फेरीवाल्यांनी असे गैरवर्तन केल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवू असा इशारा मनसेने कार्यकर्त्यांनी दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT