Pink Rickshaw Yojana : 'लाडकी बहीण' नंतर महिलांसाठी आणखी एक योजना, काय आहे पिंक रिक्षा योजना?

मुंबई तक

Pink Rickshaw Yojana Scheme : लाडकी बहीण योजनेनंतर आता उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंक रिक्षा योजनेची घोषणा केली आहे.ज्या गरीब महिला आहेत, त्या महिलांना या पिंक रिक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

पिंक रिक्षा योजना नेमकी काय आहे?
ajit pawar announce new scheme for women pink rickshaw yojana mukhmantri ladki bahin yojana
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पिंक रिक्षा योजना नेमकी काय आहे?

point

या योजनेचा फायदा कुणाला होणार आहे?

point

अजित पवारांनी पिंक रिक्षा योजनेची घोषणा केली आहे.

Pink Rickshaw Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये जमा होणार आहे. या योजनेची चर्चा असताना राज्य सरकारने गरीब महिलांसाठी आणखी एक योजना आणली आहे. या योजनेचे नाव पिंक रिक्षा योजना आहे? ही योजना नेमकी काय आहे? या योजनेचा फायदा कुणाला होणार आहे? हे जाणून घेऊयात.  (ajit pawar announce new scheme for women pink rickshaw yojana mukhmantri ladki bahin yojana ) 

लाडकी बहीण योजनेनंतर आता उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंक रिक्षा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील गरीब महिलांना मिळणार आहे. ज्या गरीब महिला आहेत, त्या महिलांना या पिंक रिक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. 

कुणाला मिळणार लाभ? 

उप मुख्यमंत्री अजित पवारांनी आज पिंक रिक्षा योजनेची घोषणा केली आहे. राज्यातील 17 शहरातील 10 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत.ज्या महिला गरीब आहेत, त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. 

हे ही वाचा : Sharad Pawar: बंद खोलीत पवार- CM शिंदेंची भेट, कशाबद्दल झाली चर्चा? Inside Story

महिलांना पिंक रिक्षा कशी मिळणार? 

ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. त्या महिलांना ही पिंक रिक्षा मिळणार आहे. विशेष म्हणजे या पिंक रिक्षाची 20 टक्के रक्कम ही सरकार भरणार आहे. आणि 10 टक्के रक्कम ही अर्जदार महिलांना भरावी लागणार आहे. उरलेली 70 टक्के रक्कम बँकेच्या लोनच्या माध्यमातून भरावी लागणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp