Radhika Merchant Anant Ambani pre wedding: 3 दिवस फक्त जल्लोष, 1000 पाहुणे अन् 2500 पदार्थ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Anant Ambani Radhika  Wedding
Anant Ambani Wedding
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनंत अंबानीच्या लग्नात तीन दिवस जल्लोष

point

अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये असणार खास मेन्यू

Anant Ambani: मुकेश आणि नीता अंबानी (Mukesh-Neeta Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत (Anant Ambani) याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. अनंत आता लवकरच राधिका मर्चंटसोबत शाही थाटात लग्न करणार आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये (jamnagar Gujrat) 1 ते 3 मार्च रोजी दोघांची प्री-वेडिंग पार्टीही होणार आहे. 

ADVERTISEMENT


सेलिब्रिटी देणार आशीर्वाद 

या सोहळ्यात देश-विदेशातील सुमारे 1000 लोक सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय नेते आणि सेलिब्रिटी अनंत-राधिकाला आशीर्वाद देणार आहेत. या शाही सोहळ्याचा फूड मेनूही अगदी खास असणार आहे. कार्यक्रमासाठी काम करणारी हॉस्पिटॅलिटी टीमच्या म्हणण्यानुसार, या विवाह समारंभातील जेवणाबाबत पाहुण्यांच्या आवडीनिवडींची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

प्री-वेडिंग सेलिब्रेशन

या जेवणाबाबत आवडी निवडीचा विचार करून ज्या गोष्टी खाल्ल्या जाणार नाहीत त्या गोष्टी टाळल्या जाणार आहेत. त्यामुळे प्री-वेडिंग सेलिब्रेशनला उपस्थित राहणाऱ्या सर्व पाहुण्यांच्या टीमकडून त्यांच्या खाद्यपदार्थांच्या निवडीबाबत माहिती मागवण्यात आली आहे. प्रत्येक पाहुण्यांच्या आहारविषयक या कार्यक्रमात काळजी घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

हे वाचलं का?

जपानी खाद्यपदार्थांचाही समावेश

अनंत आणि राधिकाच्या लग्न समारंभासाठी इंदूरमधील सुमारे 25 शेफची खास टीम प्री-वेडिंग बॅशसाठी तयार करण्यात आली आहे. कार्यक्रमामध्ये इंदोरी खाद्यपदार्थाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याचबरोबर पारशी, थाई, मेक्सिकन, जपानी खाद्यपदार्थांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

या विवाह समारंभामध्ये तीन दिवस पाहुण्यांना 2500 प्रकारचे पदार्थ दिले जाणार आहेत. यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि मध्यरात्री स्नॅक्सचा समावेश असणार आहे.

ADVERTISEMENT

जेवणात 250 प्रकारचे खाद्यपदार्थ

या लग्नामध्ये ब्रेकफास्ट मेनूमध्ये 70 प्रकारचे पदार्थ असार आहेत. तर पाहुण्यांना दुपारच्या जेवणामध्ये 250 आणि रात्रीच्या जेवणात 250 प्रकारचे खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत. 

ADVERTISEMENT

तसेच या शाही लग्न समारंभामध्ये कोणत्याही डिशची पुनरावृत्ती होणार नाही याचीही काळजी घेतली जाणार आहे.तर पार्टीचा आनंद घेणाऱ्यांसाठी मध्यरात्री फराळाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मार्क झुकरबर्ग आणि बिल गेट्स

या विवाह समारंभाच्या पाहुण्यांच्या यादीमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मोठ मोठ्या लोकांना आमंत्रित करण्यात आली आहेत. या सेलिब्रेशनला मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, रजनीकांत उपस्थित राहणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर रिहाना, अरिजित सिंग आणि दिलजीत दोसांझ प्री-वेडिंग बॅशमध्ये परफॉर्म करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
 

हे ही वाचा >> 'जरांगेंचा विश्वास फक्त शिंदेवर', फडणवीसांवर नाही, दानवेंचा घणाघात

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT