Andhra Pradesh Train Accident: रेल्वे धडकल्या… 13 प्रवाशांचा मृत्यू, भयंकर अपघाताचं कारण आलं समोर

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

So far 13 people have died in a train accident in Vizianagaram district of Andhra Pradesh. About 50 people have been injured in this accident.
So far 13 people have died in a train accident in Vizianagaram district of Andhra Pradesh. About 50 people have been injured in this accident.
social share
google news

Railway Accident : आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, ‘दोन गाड्यांमधील टक्कर ‘मानवी चुकीमुळे’ झाली असावी.’ रेल्वेमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. पीएम मोदी आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही अतिरिक्त मदतीबाबत ववक्तव्य केलं आहे. (Andhra Pradesh Train Accident 13 passengers died the reason behind it came to light)

अपघाताचे संभाव्य कारण ‘मानवी चूक’ असू शकते. विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर रेल्वेने सिग्नल ओलांडला. ओव्हरशूटिंग म्हणजे जेव्हा एखादी रेल्वे लाल सिग्नलवर थांबण्याऐवजी पुढे जाते.

वाचा : कसाबच्या फाशीवेळी नेमकं वातावरण कसं होतं, मीरा बोरवणकरांनी सांगितली कहाणी

29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दोन गाड्यांमध्ये धडक झाली होती. विशाखापट्टणमहून पलासाकडे जाणारी स्पेशल पॅसेंजर ट्रेन कोठासावत्सलाजवळ अलमांडा आणि कंटकपल्ले दरम्यानच्या रुळांवर सिग्नलअभावी थांबली होती. त्यानंतर विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजर ट्रेनने त्याला धडक दिली. त्यामुळे तीन डबे रुळावरून घसरले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मृत आणि जखमींना नुकसान भरपाईकिती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

वाचा : नीलम गोऱ्हेंनी पुण्यात केला होता दंगल घडवण्याचा प्रयत्न, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी म्हणाले, ‘अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत आंध्र प्रदेशातील लोकांसाठी आहे. ज्यांचा मृत्यू झाला आहे आणि इतर राज्यातील आहेत त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. आंध्र प्रदेशातील गंभीर जखमी प्रवाशांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि इतर राज्यातील गंभीर जखमी प्रवाशांना 50,000 रुपये देण्यात येणार आहेत.’

ADVERTISEMENT

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ‘मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई मिळू लागली आहे. गंभीर जखमी आणि मध्यम जखमींना 2 लाख आणि 50 हजार रुपयांची भरपाई दिली जात आहे.’

ADVERTISEMENT

वाचा : याकूब मेमनच्या मुलीला पासपोर्ट मिळावा यासाठी मीरा बोरवणकरांनी का केला होता प्रयत्न

राष्ट्रपती मुर्मू, पीएम मोदी, रेल्वेमंत्री, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेड्डी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT